Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मिशन ११ वी अँडमिशन : आजपासून प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरा; सहा जुलैला पहिली गुणवत्ता यादी

Share
File Photo

नाशिक | प्रतिनिधी 

दहावीचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. नुकतेच अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून आजपासून (दि.१९) ते २३ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात ६ जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

या यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश महाविद्यालयात घेता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे.

दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग १ जूनपासून भरला जात होता. यंदा सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा  निकाल घसरल्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे पडणार असल्याचे चित्र वर्तवले जात होते.

त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी गुण ग्राह्य धरण्याची मागणी पुढे आली होती. परिणामी, संभ्रम निर्माण झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध होण्यास विलंब झाला होता.

दरम्यान, शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जवळपास २३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरला असून त्यापैकी १९ हजार विद्यार्थ्यांची अर्जाची पडताळणी झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!