Exclusive : पेट्रोल वाढीमुळे नाशिकचा शेतकरी विकतोय घोड्यावरून दूध

0

देशदूत डिजिटल विशेष

बेलगाव कुऱ्हे (लक्ष्मण सोनवणे) |  शेतीला पुरक जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यावसाय करतात. दुध घेऊन तालुक्याच्या ठिकाणी किंवा जवळच्या शहरात दुध विक्री होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर भरमसाट वाढले आहेत. पेट्रोलवर मोठा खर्च होत असल्यामुळे वाहन वापरणे परवडत नाही. यामुळे नाशिक जिल्ह्यातील आणि इगतपुरी तालुक्यातील बेळगाव कुऱ्हे येथील शेतकऱ्याने चारचाकी आणि दुचाकी वाहन घराबाहेर उभे करून थेट घोड्यावरूनच दुधविक्रीसाठीला सुरुवात केली आहे.

काळू गोवर्धने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घरी दुचाकी आहे, चारचाकी वाहनदेखील आहे. परंतु इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच दुधाचे भाव जैसे थे आहेत. त्यामुळे व्यवसाय धोक्यात सापडला आहे. वाहतुकीसाठी पेट्रोल परवडत नाही. चारा व पशुखाद्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

परंतु उदरनिर्वाह दुधावर अवलंबून असल्यामुळे दुध विक्री करावी लागते. यामुळे वाहन न वापरता घोड्यावरूनच  दुध विक्रीला सुरुवात केली आहे.

पूर्वीच्या काळी घोड्याचा वापर वाहतुकीसाठी केला जात असे. परंतु आता इंधन दर वाढल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे ते सायकल किंवा घोड्याचा पर्याय अवलंबताना दिसून येत आहेत.

दुधावरच कुटुंब चालत त्यामुळे ग्राहकांना दुध वेळेत पोहोच करावे लागते. दुचाकी परवडत नाही म्हणून घोड्यावर दुधाची वाहतूक करून दुध ग्राहकांना वेळेत पोहोच करतो असे गोवर्धने सांगतात.

LEAVE A REPLY

*