Video : महाराष्ट्रातील तिसऱ्या ‘मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी’ दालनाचा नाशिकमध्ये शुभारंभ

दुकानदारांना मिळणार सवलतीत माल; अडीच हजार शेतकऱ्यांकडून थेट मालाची खरेदी

0
नाशिक | नाशिकमध्ये ‘मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी’चे पहिले होलसेल स्टोअर नाशिक पुणे रोड परिसरात आजपासून खुले करण्यात आले आहे. किराणा, कपडे, मांस, भाजीपाला इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टी याठिकाणी नोंदणीकृत दुकानदारांना होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे नाशिकमधील कोंडाजी चिवडा, रामबंधू मसाले, इंद्रायणी तांदूळ, द्राक्षे आदि वस्तू ‘मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी’मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मेदिरत्त यांनी दिली.

ते नाशिकमध्ये ‘मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी’च्या  दालनाच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधत होते. अरविंद पुढे म्हणाले, नाशिकमधील मेट्रो  दालन भारतातील २६ वे व महाराष्ट्रातील तिसरे दालन आहे. नाशिकमधील दालनामुळे जवळपास ५०० पेक्षा अधिक नागरिकांना रोजगार याद्वारे उपलब्ध झाला आहे. गुजरात आणि महारष्ट्रातील मुख्य   वितरणाचे केंद्र   म्हणून नाशिक येणाऱ्या   काळात पुढे येईल.

स्थानिक गरजांचा अभ्यास करून ताजे पदार्थ, किरणा माल यांसह इतर माल याठिकाणी उपलब्ध होईल. मेट्रोचे नाशिकमधील जे स्टोअर आहे त्यात जवळपास फूड आणि नॉन फूडचे जवळपास ६ हजार पेक्षा अधिक उत्पादने विविध ऑफर्सने विक्री होणार आहेत. हे स्टोअर शहरातील ४० हजार दुकानदारांची गरज पूर्ण करेल असे सांगण्यात आले आहे. या स्टोअरमध्ये ५ हजार पेक्षा अधिक स्टोअर्स, हॉटेल, व रेस्टोरंटचे मालक, कॅटरर्स, सेवा व कंपन्या कार्यालये यांचा यात समावेश आहे. 

कॅपिटल फ्लो कंपनीद्वारे लहान दुकानदारांना कर्ज किंवा क्रेडीटदेखील मिळणार आहे. त्यामुळे माल घेतल्यानंतर दुकानदारांना नाममात्र शुल्कात महिनाभरात पैसे परत करावयाची सुविधा देण्यात येणार आहे. शेतकरी थेट आपला माल याठिकाणी विकू शकतात. दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच हवामानाच्या बदलाबाबत पिकांची निवड याबाबत मार्गदर्शन केले जाते.

म्हणून नाशिकची निवड…

महाराष्ट्रात मुंबईसोबतच पुणे नागपूर औरंगाबाद मोठी शहरे आहेत. मग नाशिकची निवड का केली? असा प्रश्न विचारल्यानंतर अरविंद म्हणाले की, नाशिककडे आम्ही गुजरात आणि पच्छिम भारताला जोडण्याच्या दृष्टीकोनातून बघत आहोत. तसेच नाशिकमध्ये जास्त वाहतूक कोंडी नाही. जमिनीच्या किंमती बेतात आहेत. तसेच याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत नाही. तसेच मुंबई नंतर चित्रपटसृष्टीला नाशकात वाव आहे. अनेकजण नाशिकमध्ये वास्तव्यासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे आम्ही नाशिकची निवड केली.

९९ टक्के उत्पादने स्थानिक पुरवठादारांकडून घेणार

आतापर्यंत अडीच हजार शेतकऱ्यांना आम्ही जोडले असून त्यांच्याकडून थेट शेतातून भाजीपालासह तत्सम वस्तू आम्ही घेणार आहोत. नाशिकमधील अनेक उत्पादनांची चर्चा जगभरात होते. अॅग्रो क्षेत्रात नाशिकचा विकास होत आहे. शेतकरी सधन असून  वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब शेतकरी करू लागला आहे. त्यामुळे नाशिकच्या मातीतले उत्पादन विक्रीसाठी आम्ही याठिकाणी ठेवणार आहोत.

LEAVE A REPLY

*