नाशिककरांना थंडीपासून दिलासा; तपमानाचा पारा १०.२ अंशांवर

0
file photo

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाच बळी घेतलेल्या थंडीची लाट आज अचानक कमी झाली. काल(दि.१०) पाच अंशांवर असलेले तपमान आज अचानक १०.२ अंशांवर जाऊन स्थिरावले. आजच्या कमी झालेल्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांसह सर्वांनाच काही अंशी दिलासा मिळाला आहे.

उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम महाराष्ट्रावर झाल्यामुळे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रचंड थंडीचा कडाका जाणवत होता.

थंडीच्या या लाटेने मनमाडमध्ये दोन आणि नाशकात तीन बेवारसांचा बळी घेतला. नाशिकमध्ये सलग दोन दिवस नीचांकी तपमान होते.

आज नाशकात १०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. थंडीचा मोठा फटका जिल्ह्याला बसला असून द्राक्ष हंगाम पंधरा दिवस लांबणीवर पडला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात किमान तापमान 17 ते 20 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे राज्यातून थंडीच गायब होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली होती. मात्र, उत्तरेत हिमवृष्टी सुरु असल्यामुळे आलेल्या शीतलहरीने राज्यात कडाक्याची थंडी पडली होती.

या थंडीची सर्वाधिक झळ नाशिक आणि नगर जिल्ह्याला बसली. बदललेल्या हवामानामुळे व थंडीच्या लाटेनंतर मध्य महाराष्ट्रात आजपासून तीन दिवसांत काही भागात तुरळक पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

*