Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘मी पुन्हा आलो…मी पुन्हा गेलो’…; राजीनाम्यानंतर मिम्सचा पाऊस

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अवघ्या ७८ तासांच्या आताच फडणवीस सरकार कोसळल्यानंतर सोशल मीडियात मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला. राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबतच चाणक्य म्हणून समजल्या जाणाऱ्या अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल झाल्या.

अनेकांनी शहर पवार यांना बादशाह संबोधले तर शिवसेनेच्या नेत्यांनी पवारांना महाशिवआघाडीचे जनक म्हटले. कॉंग्रेसनेही आजच्या संपूर्ण घटनेचे श्रेय शरद पवार यांना दिले. तर दुसरीकडे राज्यातील जनतेने सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो अपलोड करून भाजपमुक्त महाराष्ट्र केल्यामुळे आभार व्यक्त केले.

दुसरीकडे ८० वर्षांच्या तरुणाने ८० तासांत फडणवीस सरकार पाडल्याचा आनंद सोशल मीडियात फिरत होता. तर अनेकांनी क्यू हिला डाला ना! असे म्हणत शरद पवार यांचे फोटो शेअर केले.  तसेच देवेंद्र गेम झाला रे, अजित पवार क्लीन चीट घेऊन पळाला रे अशा आशयाचे मोदींनी पगडी घातलेले फोटो सोशल मीडियात शेअर झाले.

आजच्या राजकीय घडामोडीनंतर काही निवडक मिम्स

गाडीभर पुरावे नष्ट करून अजित दादांचा

उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा


मी पून्हा येईन
मी पून्हा येईन
मी पून्हा येईन
✋🏻
अजितदादा – मी नाही येत..मला घरचे सोडत नाहीत…


छगन भुजबळांचा अजित पवार यांना वडीलकीचा सल्ला

एकवेळ इडी माग लागली तर चाललं

पण तुझा चुलता माग लाऊन घेऊ नको…


Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!