Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : कोरड्या दुष्काळाशी दोन हात करून कसंतरी उभं राहिलो; आता ओल्या दुष्काळाने हातातोंडाचा घास हिरावला

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव तालुक्यातील मेहुणे, ज्वार्डी परिसरात उन्हाळ्यात सर्वाधिक दुष्काळाची परिस्थिती होती. येथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना थेट मालेगावी जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत होते. सुरुवातीला पावसानेही दडी मारलीच होती, मात्र, जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार हजेरी या परिसरात झाली. यामुळे येथील शेती हिरवीगार झाली, पिकं बहरली होती मात्र परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने येथील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. कोरड्या दुष्काळातून सावरलेला शेतकरी ओल्या दुष्काळात कर्जबाजारी झाला.

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मक्याच्या पिकला जीवाचे रान करून बाहेर काढले. पिकाची काळजी घेऊन वेळोवेळी खत खाद्यांची भर तिथे दिली. प्रसंगी कर्जही काढली. गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली शेती पुन्हा एकदा उभारी घेईल. कर्जाचा डोंगर हलका होईल हीच आशा येथील शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने थैमान घातल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला.

पंचक्रोशीतील संपूर्ण पिक पाण्यात भिजले; तरीही शेतकरी थांबला नाही, न खचता गुडघ्याइतक्या पाण्यात शेतकऱ्यांनी शेतातून मक्याची कणसे आवरली. गुरांसाठी लागणारा मक्याचा कडबा मात्र पूर्णपणे पाण्यात सडला आहे. याठिकाणी पाण्यात भिजलेल्या मक्याच्या काही कणसांना कोंबदेखील फुटले आहेत.

मक्याचे, बाजरीचे पूर्णपणे उत्पन्न पाण्यात होत्याचे नव्हते झाल्याने येथील शेतकऱ्यांवर आभाळच कोसळले आहे. राज्यात सत्तेचा तिढा अद्याप सुटलेला नाही, येथील शेतकऱ्यांनी सरकार स्थापन व्हावे आणि शेतकऱ्यांना या अस्मानी आणि सुलतानी संकटातून बाहेर काढावे अशी मागणी केली आहे.


अद्याप पंचनामे झाले नाहीत

याठिकाणी अद्याप शासनाच्या वतीने पंचनामे झालेले नाहीत. कर्ज काढून हे पिक जागवल होतं, मजुरी तसेच घरातल्या माणसांचे कष्ट या पावसामुळे धुळीस मिळाले आहे. याठिकाणी पंचनामे करून लवकरात लवकर आम्हाला मदत करावी.

केवळ आहिरे, मेहुणे


कर्जाचा डोंगर पुन्हा उभा राहिला

यंदा पावसाळा चांगला आहे म्हणून यावर्षी आलेल्या खरिपाच्या पिकातून थोड्याबहुत प्रमाणात कर्ज कमी होईल असे वाटत होते. पिक जोमदार यावे यासाठी शेणखत, रासायनिक खतांचा वेळोवेळी डोस दिला. पिक जोमदार होते, मात्र या पावसाने हातचे होते नव्हते सर्वकाही हिरावले आहे. उलट आमचा या पिकला झालेला ८० ते ९० हजरांचा खर्चदेखील कर्जरुपात अंगावर पडला आहे.

भाऊसाहेब आहिरे, मेहुणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!