Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनामपूर रुग्णालय सील; वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

नामपूर रुग्णालय सील; वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

मालेगाव : प्रतिनिधी 

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर नामपूर आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. तसेच येथील स्टाफची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

यासोबतच १ एप्रिल ते ८ एप्रिलच्या काळात मोसम खोऱ्यातील ज्या रुग्णांनी नामपूर रुग्णालयात येऊन उपचार घेतले असतील त्यांनी त्वरित आपली माहिती ग्रामपंचायतीस किंवा जिल्हा प्रशासनाला द्यावी. असे आवाहन ग्रामविकास अधिकारी के.बी.इंगळे. यांनी केले आहे.

नामपूर रुग्णालयातील करोनाबाधित वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथून ये-जा करतात. मालेगावात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्नीपासून कोरोनाची बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

ज्या रुग्णांनी त्यांच्याकडे उपचार  घेतले असतील त्यांनी त्वरित याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावयाची आहे. वेळीच सहकार्य करून कोरोनाचा वाढता फैलाव रोखता येईल यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मोसम खोऱ्यात येणाऱ्या गावांमध्ये आज सकाळपासून दवंडी पिटवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.  मालेगावमधून कोरोनाने बागलाण तालुक्यात शिरकाव केला असला तरीदेखील कोन्हीही सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांना बळी पडू नये. प्रशासन जी माहिती देईल ती गृहीत धरावी धरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नामपूर रुग्णालयात आलेले रूग्ण किंवा नातेवाईक वरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले असतील तर त्यांचे सर्व्हेक्षण करून तात्काळ  होम कॉरन्टाईन करण्याचे काम शासन पातळीवरून सुरू झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या