लग्नकार्यातील खर्चिक प्रथा मातोरीच्या शेतकऱ्यांनी केल्या हद्दपार

0

नाशिक, ता. ४ : शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या बडेजावी प्रथा मातोरी, ता. नाशिक येथील ग्रामस्थांनी आज एकत्र येत हद्दपार करण्याचा अभिनव निर्णय घेतला.

लग्नकार्य, साखरपुडा, हळदीसमारंभ, वरात, श्राद्ध, दशक्रिया या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक व अकारण अशा खर्चिक बाबी टाळून जुन्या प्रथांना तिलांजली देण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी आज एकत्रितरित्या घेतला.

गेल्या तीन वर्षांपासून शेतमालाच्या किंमती गडगडल्याने अनावश्यक होणारा खर्च टाळून व जुन्या प्रथा बंद करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या निर्णयामध्ये पुढील बाबींचा समावेश असणार आहे.

  • विवाहाच्या आदल्या दिवशी वर वधू पक्षाकडे जाताना कुठलीही मिरवणूक काढणार नाही, तसेच डीजे लावणार नाही. यावेळी केवळ चहापान केले जाईल.
  • हळदीसमारंभास वर आणि वधू यांचे अगदी जवळचे नातेवाईक उपस्थित राहतील.
  • विवाह सभारंभात वधू व वर यांची घरची मंडळी सोडून इतर पाहुण्यांना टॉवेल टोपी, फेटा, उपरणे, शाल व भेटवस्तू आदींना फाटा देण्यात आला आहे.
  • विवाहप्रसंगी व मिरवणुकीत डीजे वाजविला जाणार नाही. तसेच फटाकेही वाजविले जाणार नाही. मेहेंदीचा कार्यक्रम व अनावश्यक जेवणावळी पूर्ण बंद करण्यात येतील.
  • दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध, वास्तूशांत, विवाह कुणीही ग्रामस्थ अथवा पाहुण्यांनी टॉवेल टोपी, नारळ, शाल, उपरणे, भांडीकुंडी, साडी, पातळ, फर्निचर, कपडे आदी आहेर अजिबात आणू नये असा नियम करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*