Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये बाजारपेठा बंदच;एकल दुकानांना परवानगी

नाशिकमध्ये बाजारपेठा बंदच;एकल दुकानांना परवानगी

नाशिक । दि.5 प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.त्यामुळे बाजारपेठा बंदच राहणार असून फक्त एकल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.या  ठिकाणी सामाजिक अंतर व सुरक्षेच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.मात्र हॉटेल, शॉपिंग मॉल, सलून, जीम मद्य विक्री हे बंद ठेवले जाणार आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड व ऑरेंज झोनमधील सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याची दिवसभर चर्चा होती. मात्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (दि.5) पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक व दुकानदारांमध्ये असलेला संभ्रम दूर करुन फक्त एकल दुकाने उघडण्यास परवानगी देत असल्याची माहिती दिली.

लॉकडाऊन तीनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता रेड व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यात एका लाईनमधील पाच दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नेमकी कोणती दुकाने सुरु करायची याबाबत प्रचंड गोंधळ होता. जीवनावश्यक वस्तुचीच दुकाने सुरु राहतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन शहरातील एकल दुकाने सुरु करण्याचे आदेश देत यापूर्वी लावलेले निर्बंध मागे घेतले. त्यामुळे एकल दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे राहणार बंदच

सामाजिक व राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार,सिनेमा व नाटयगृह,पान, तंंबाखू, मद्य दुकान, शॉपिंग मॉल, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, बार व सभागृह,परवानगी असलेल्या हॉस्पिलिटी वगळून इतर  सेवा,केंद्रिय गृह मंत्रालयाद्वारे परवानगी दिलेली वाहतूक व सुरक्षा दलाची वाहतूक वगळून इतर प्रवासी सेवा, अांंतरराष्ट्रिय व देशअंतर्गत हवाई सेवा,वैदयकीय कारणास्तव दिलेली परवानगी वगळता अांंतर जिल्हा व आंतरराज्यीय वाहतूक,शाळा, कॉलेज, कोचिंग संस्था, लग्नासाठी 50 लोकांना परवानगी,अंत्यविधीसाठी 20 लोकांची उपस्थिती,अ‍ॅटो रिक्षा, टॅक्सी व कॅब सेवा,बस सेवा,सलून व स्पा दुकाने.

हे नियम बंधनकारक

सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जादा व्यक्ति एकत्र येण्यास मनाई.सामाजिक अंतर पाळणे,मास्कचा वापर,सॅनिटायझरचा उपयोग.
प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात सायंकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत अत्यावश्यक कारण वगळता संचार करण्यास मनाई.
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा दुकानांसाठी सकाळी10 ते दुपारी 4 ची वेळ. दूध विक्रीकरीता स.6.30ते 7.30 व दु.4 ते सांय 5.30चे बंधन
प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रात   सकाळी 7 ते सायकाळी 7 या वेळेत दुकाने सुरु राहतील.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गर्भवती महिला यांनी घरात रहावे.

प्रतिबधित क्षेत्रात निर्बंध कायम

नाशिक शहर – 10
मालेगाव – 55
इतर जिल्हा – 10

मद्य दुकानांबाबत लवकरच निर्णय

मद्य दुकानात झालेल्या गर्दिमुळे लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता. जिल्हाधिकार्यांनी मद्य दुकाने बंदीचे आदेश काढले होते. मात्र पालकमंत्री भुजबळ यांनी हमीपत्रावर लिहून घेउन मद्य दुकाने खुली करण्याची परवानगी देता येइल असे सांगितले. या बाबत  जिल्हाधिकार्यांनी  अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना यासंदर्भात योजना पाठवणेस सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या