Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

झेंडूच्या फुलांना सोन्याची झळाळी; दसऱ्याचा पूर्वसंध्येला नाशिकला पिवळी दुलई

Share

नाशिक | प्रतिनिधी 

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये झेंडूचे फुलं दाखल झाली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर पंचक्रोशीतील विक्रेत्यांनी झेंडूची किरकोळ विक्री आणि फुलमाळा विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये शेकडा तर घाऊक बाजारात झेंडूच्या एका जाळीला २५० ते ३०० रुपयांचा दर मिळत आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाव चांगले असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असून आवक वाढल्यानंतर काहीशा प्रमाणात यात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ग्राहकांची अपेक्षा असून उद्या पहाटेपासून झेंडूच्या फुलांना आणि माळा घेण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. याहिशेबाने विक्रेते कामाला लागले आहेत. झेंडूच्या फुलांसोबत आपट्याच्या पानांनादेखील मागणी वाढली असून त्यांनाही सोन्याच्या दराप्रमाणे ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहे.

कालच होऊन गेलेल्या मुसळधार पावसामुळे बाजार पेठेत त्याचा परिणाम दिसून आला आहे . अनेक शेतकऱ्यांचे फुलांच्या उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. दसर्याची बाजारपेठेतील मागणी बघता त्यांना चांगली फुले बाजारात आणली आहेत. यामुळे सुरुवातीपासूनच फुलांचे दर आज दुपारपासूनच चढे आहेत.

नाशिकमधील फुलबाजार पेठ ही मोठी बाजारपेठ असल्याने येथे अनेक भागातून विक्रेते फुलविक्रीसाठी दाखल होतात. अंबिका ओझर , पिपरी, नांदुरी , मोहंदरी, जांबशेत, चिंचोरे, बोरदैवत, देवळी , बिलवाडी अशा खेडेगावातून लोक रात्री पासून नाशिकमध्ये दाखल झाले असून रात्रभर फुलांच्या माळा करून याच ठिकाणी हे कुटुंब वास्तव्य करतात.

झेंडूच्या फुलांप्रमाणेच निशिगंधा, शेवंतीच्या फुलांना मागणी वाढली आहे. झेंडूची फुले ८० रुपये शेकडा आहे. निशिगंधा ८० रुपये पावशेर तर शेवंती ६० रुपये पावशेर असे आहेत.

यासोबतच झेंडू, कलकत्ता पिवळा आणि लाल रंगाचे दाखल झाले आहेत.  झेंडूच्या फुलांच्या माळा ५० रुपये प्रतीमाळ तर आपट्याची पाने १० रुपये प्रती फांदी असे दर आहेत.

(फोटो : भूषण क्षिरे)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!