Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पावसाने मारले…उन्हाने तारले; मातीमोल भावात विक्री झालेल्या फुलांचे भाव अचानक वधारतात तेव्हा

Share

नाशिक । प्रतिनिधी

दसर्‍याच्या वेळी वातावरण निरभ्र असल्यामूळे फुलांचा दर्जा चांगला होता परिणामी शेतकर्‍यांना मोबदला चांगला मिळाला. मात्र, लक्ष्मीपुजनाचा वातावरणात झालेल्या अमुलाग्र बदलांचा फटका सर्वसामान्य शेतकरी आणि फुलविक्रेत्यांना बसला. मातीमोल किंमतीत झेंडूची विक्री झाली. तर लक्ष्मीपुजनाच्या दुपारनंतर फुलं कोरडी झाल्यानंतर फुलांची दर वाढले होते. तर दुसरीकडे शेतकर्‍यांना फुलांचा मोबदला चांगला मिळावा यासाठी नाशिकमधील काही समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेत प्रबोधन केल्यामूळे अनेक शेतकर्‍यांनी समाधानदेखील व्यक्त केले.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारपेठेत धनत्रयोदशीपासूनच झेंडूच्या फुलांची विक्री होत होती यामूळे बाजारात आवक वाढली. स्थानिक व्यापार्‍यांनी फुलांचा दर्जा आणि आवक बघून मातीमोल किंमतीत फुलांची खरेदी केली. यानंतर कल्याणला गेलेली फुलं शेतकर्‍यांनी कसारा घाटात फेकलेली दिसून आली होती. तर काही शेतकर्‍यांनी फुलं वाहतूकीचा खर्चदेखील न निघाल्याने नाराजी व्यक्त केली.

यानंतर मुख्य बाजारपेठ असलेल्या शहराच्या वेगवेगळ्या भागात थेट जाळीवर झेंडूच्या फुलांची विक्री सुरु केली. यासही थंड प्रतिसाद मिळत होता. दरम्यान, जो भाव नागरीकांना सांगितला त्यातही नागरीक फुलं घेताना घासाघिस करताना नजरेस पडले. यामूळे शेतकरी अधिकच संकटात सापडला होता.

दरम्यान, लक्ष्मीपुजनाचा मुहूर्त सायंकाळी असल्यामूळे फुलांची मागणी सायंकाळच्या सुमारास वाढली. तसेच दुपारनंतर ऊन पडल्यामूळे फुलं कोरडी झाली होती यामूळे सायंकाळी फुलविक्रेत्यांनी चांदी झाली. आदल्या दिवशी रात्रीपासून न मिळालेला भाव दुपारी मिळाल्याने फुलविक्रीचा शेवट गोड झालेला दिसून आला.


झेंडूची फुले अभियान जनजागृती

ऐन दिवाळीत पावसाने थैमान घातल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. सण उत्सवांच्या काळात शेतकर्‍यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाशिकमधील संवेदनशील शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीकांच्या एका समुहाने नाशिकमध्ये फुलबाजारांमध्ये किमान 50 रुपये किंमतीत झेंडू खरेदी करावा अशी साद घातली. अनेक ग्राहकांनी याला प्रतिसाद देत घासाघिस न करता झेंडूची खरेदी केली.

प्रा ज्ञानोबा ढगे, पिंपळगांव महाविद्यालय


बळीमंदिर परिसरात शेतकरी आणि फुलविक्रेत्या महिलेचे संभाषण

शेतकरी : पिकअप वाहनातून उतरत कशी दिली फुलांची माळ?

फुलविक्रेती महिला :
ही लहान माळ 30 रुपये, मोठी 50 आणि गाडीसाठी ही सर्वात मोठी आहे, ती 200 रुपयांना.

शेतकरी : हसत, रात्रभर जागलो तेव्हा कुठे एका गाडीतले फुलं विक्री झाली. पाच रुपये पेक्षा प्रतिकिलो दराने फुलं विक्री करुन आलो. तर तुम्ही काहीही किंमत सांगत आहात.

महिला : वातावरण बददल्याने फुलं कोरडी झाली म्हणून भाव वाढला आहे, एक रुपयाही कमी होणार नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!