Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सगळीकडे पावसाचा हाहाकार; मनमाडमध्ये मात्र ऐन पावसाळ्यात येतेय आठ दिवसांनी पाणी

Share

मनमाड (बब्बू शेख) | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागासह नाशिक जिल्ह्यातील देखील काही भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  या पावसामुळे जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले तर नदी-नाल्यांना देखील पूर आले आहेत.  मात्र, दुसरीकडे मनमाड शहर परिसरात केवळ रिमझिम पाऊस होत असून विशेषता वागदरडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर दमदार पाऊसच झाला नसल्याने धरण कोरडेठाक आहे.

यामुळे मनमाड शहरात ऐन पावसाळ्यात आठवडाभराने पाणीपुरवठा होत आहे. पाणी टंचाई आज ही कायम आहे.धरणात सध्या जो पाण्याचा जेमतेम साठा आहे तो पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्याचा असून त्यातून पालिके तर्फे १२ ते १५ दिवसा नंतर पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे भरपावसळ्यात देखील शहरातील सव्वालाख नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईसह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घालत हाहाकार माजवला तर आता देखीलपश्चिम महाराष्ट्रा मुसळधार पाऊस थैमान घालत आहे.सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले तर नदी-नाले देखील दुथडी भरून वाहत आहे.

मात्र, पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटलेला असतांना देखील मनमाड शहर परिसरासोबत वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील रिमझिम पाऊस वगळता जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे धरणात पावसाचे पाणी न आल्यामुळे उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई पावसाळ्यात देखील कायम आहे सध्या पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हे पूर पाणी पटाच्या माध्यमातून येत असल्याने  पालिका प्रशासना तर्फे हे पाणी पाटोदा साठवणूक तलावात घेतले जात आहे तेथून पंपिंग करून हे पाणी वागदर्डी धरणात उचलण्यात येत आहे.

सध्या वागदर्डी धरणात असलेल्या जेमतेम पाण्याच्या साठ्यातून शहरात १२ ते १५ दिवसा नंतर पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे उन्हाळ्या प्रमाणे पावसाळ्यातही भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.रिमझिम पावसामुळे मान टाकलेल्या पिकांना जीवदान तर मिळाले पण नदी-नाल्यांना पाणी आले नसल्याने विहिरी कोरड्याच आहे त्यामुळे शेतकरी काहींसा चिंतीत झाला.

उल्लेखनीय आहे कि कोणत्या तालुक्यात किती मिमी पाऊस झाला याची शासनाला माहिती मिळावी याकरिता तहसील कार्यलय सोबतमहानगरपालिका,नगरपरिषद येथे पावसाचे मोजमाप करण्यासाठी यंत्र बसविण्यात आलेले आहे.

मात्र, नाशिक जिल्ह्यात मालेगाव नंतर मनमाड एकमेव मोठे शहर मानले जाते जिल्ह्यात क्रमांक दोनचे असलेल्या मनमाड शहर परिसरात किती मिमी पाऊस झाला याची नोंद करण्यासाठी यंत्र बसविण्यात आले नाही के यंत्र आययुडीपीत असलेल्या पालिकेच्या वाचनालयाच्या आवारात बसविण्यात आले होते.

मात्र ते यंत्र महसूल विभागातील के अधिकारी हे यंत्र घरी घेवून गेल्याचे समजते त्यामुळे मनमाड शहरात किती पाऊस झाला याची न सरकारला न जनतेला कोणालाच माहिती मिळत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!