Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० पेक्षा अधिक मजुरांना फटका

Share

बब्बू शेख | मनमाड

कोरोनाने देश विदेशातील असंख्य लोकांना देशोधडीला लावले असून अगोदर जमावबंदी नंतर संचार बंदी लागू करण्यात आल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे.याची सर्वाधिक झळ हातावर पोटभरणारे मजूर, गोरगरीब, भिकाऱ्या सोबत मुके मोकाट जनावरांना या तीन घटकांना बसत आहे.

सर्व बाजारपेठ बंद असल्यामुळे यांना पोटाची खळगी भरण्यासाठी काहीच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मनमाड शहरात सुमारे ३०० पेक्षा जास्त अशी माणस व अनेक मोकाट जनावरे असून त्यांच्या मदतीला मदतीला सध्या शहरातील काही छोट्या सामाजिक संघटना व कार्यकर्ते सरसावले व गेल्या तीन दिवसा पासून या गरजूंना त्यांच्या कडून दोन वेळ चे जेवण दिले जात आहे.

मात्र गायी,बैल,कुत्रे यासह इतर जनावरांच्या मदतीला अद्यापही कोणीच पुढे येत नसल्याने अन्नपाण्यावाचून तडफडून मारण्याची वेळ या मुक्या जनावरावर  आली आहे त्यामुळे शासनान सोबत शहर परिसरातील दानशूर व्यक्तीनी या सर्वांन मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे

मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन जंक्शन असल्यामुळे येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रेल्वेतून अनेक भिकारी येतात येथे त्यांना गुरुद्वारात चालणाऱ्या लंगर मधून पोट भर जेवण मिळत होते त्यामुळे अनेक भिकारी मरे पर्यंत येथे थांबतात.

शहरात कांदा वखारी,हॉटेल्स,बियर बार,ढाबे,गवंडीच्या हाताखाली काम करणारे मजूर यांची संख्या देखील मोठी असून शेकडो मोकाट जनावरे व भटकी कुत्रे देखील आहे.माणसांना काम मिळत होता त्यामुळे त्यांची चूल पेटत होती तर भिकाऱ्यांना गुरुद्वारा मध्ये चालणाऱ्या लंगर मध्ये पोट भर जेवण मिळत होते.शिवाय नागरीक देखील या भिकाऱ्यांना मदत करीत असायचे.

बाजार समिती,डेली भाजी मार्केट,आठवडे बाजार सुरु होते त्यामुळे मोकाट जनावरांना चारा-पाणी मिळत होता तर मटन,कोंबडी ,मच्छी मार्केट मुळे भटक्या कुत्र्यांचे पोट भरत होते मात्र अचानक कोरोना सारखा राक्षस जन्माला आला आणि त्याने संपूर्ण जगाला वेठीस धरले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र पासून राज्य सरकार पर्यंत सर्व उपयायोजन करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून रेल्वे,एसटी बंद करण्यात आल्या तर बाजार पेठेतील जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर व्यवहारावर ठप्प झाले असून  जमावबंदी,संचारबंदी देखील लागू करण्यात आली असल्याने याचा सर्वात जास्त फटका मजूर,गोरगरीब,भिकारी व मोकाट जनावरांना बसत आहे.

गुरुद्वारा मध्ये सुरु असलेल्या लंगरवर काही अधिकाऱ्यांनी मर्यादा घातल्यामुळे त्यांनी लंगर मधून भिकाऱ्यांना जेवण देणे बंद केले,तिकडे आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले अनेक कुटुंबीय रेल्वे.एसटी बंद झाल्यामुळे मनमाडला अडकले काहींच्या सोबत तर लहान मुले देखील आहे.

भिकाऱ्या सोबत यांची देखील उपासमार होत आहे तसेच मोकाट जनावरे व भटकी कुत्रे उपासी असल्याने ते सैरावैरा झाले आहे. एखादा कोणी दारात भुकेला आला तर त्याला एक पोळी का होईना पण अन्नदान करा ..तहानलेल्याला पाणी पाजा..  धर्म मानणारा भारत देश आपला.

मात्र, मनमाड शहरात अनेक जण व जनावरे भुके ने व्याकूळ झालेले असताना त्यांच्या मदतीला एक ही राजकीय पक्ष व आम्ही सामाजिक कार्य करतो अशी टीमटीमी मिरविणारे आले नाही अखेर या गरजूंच्या मदतीला धावून आले ते अशोक बाबासेवा संस्थान,नगीना मस्जिद ट्रस्ट आणि कै.अशोक मंडप याचे कार्यकर्ते तीन दिवसा पासून हे लोक गोरगरीब व भिकाऱ्यांना जेवण देत आहे मात्र गायी,बैल,मोकाट जनावरे,भटकी कुत्रे यांच्या मदतीला अद्यापही कोणीच आले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!