Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

आशियाई स्पर्धेसाठी मंजुषा पगारची निवड

Share

मालेगाव । प्रतिनिधी

चीन येथील झोनगशन येथे 9 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या दुसर्‍या आशियाई बेसबॉल स्पर्धेसाठी येथील मसगा महाविद्यालयाची विद्यार्थीनी मंजुषा पगार हिची भारतीय महिला संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय संघात निवड झाल्याने क्रिडापटू मंजुषा पगार हिच्यावर सर्वथरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील विराणे या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्म घेतलेल्या मंजुषा पगार ही गत चार वर्षापासून महाराष्ट्र बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहे. नाकोडा हरियाणा येथे झालेल्या पहिल्या सराव शिबीरात 50 पैकी 30 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. चंदीगड येथील लव्हली विद्यापिठात झालेल्या दुसर्‍या सराव शिबीरात अंतीम 18 खेळाडूंची निवड करण्यात आली.

हा 18 खेळाडूंचा संघ चीनमध्ये आयोजित दुसर्‍या आथिायाई स्पर्धेत भारतीय बेसबॉल संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या 18 खेळाडूंमध्ये विराणेची कन्या असलेल्या मंजुषा पगार हिचा समावेश आहे. प्रशिक्षक डॉ. सुरेखा दफ्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत असून भारतीय बेसबॉल संघ 7 नोव्हेंबरला चीनकडे रवाना होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!