Saturday, April 27, 2024
Homeनाशिकधाकधूक वाढली; नाशिक जिल्ह्यात करोनाचे 33 नवे रुग्ण; संख्या 665 वर

धाकधूक वाढली; नाशिक जिल्ह्यात करोनाचे 33 नवे रुग्ण; संख्या 665 वर

मालेगावी 20 पॉझिटीव्ह; आतापर्यंत जिल्ह्यात 28 बळी

नाशिक/ मालेगाव | प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासन यंत्रणेसह जनतेची धाकधूक वाढली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होण्यास सुरूवात झाली असून आज विविध नव्या गावांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यात नव्याने 33 रूग्णांची भर पडली आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्याचा आकडा 665 झाला आहे. तर आतापर्यत जिल्ह्यात करोनाचे 28 बळी झाले असून यामध्ये नाशिक शहरातील दोघांचा समावेश आहे.
दरम्यान,मालेगावमध्ये 24 तासात 20 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहर परिसरात बाधित रुग्णांची संख्या 534 वर जाऊन पोहचली आहे.

तर सहा मृत रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोनाने घेतलेल्या बळींची संख्या आज सव्वीस झाली तसेच काल आणि आज करोना सदृश्य लक्षणे दिसत असलेल्या चौघा संशयित रुग्णांचा उपचारादरम्यान जीवन व फाराण रुग्णालयात मृत्यू झाल्याने या बाधित रुग्णांच्या निकटवर्तीयांना काँरन्टाईन करण्यास आरोग्य यंत्रणेतर्फे प्रारंभ करण्यात आला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील 121 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यात 35 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यात एकट्या मालेगाव येथील 20 रूग्ण आहेत. यामुळे मालेगाव येथील करोनाग्रस्तांची संख्या 534 झाली आहे. मालेगावसह येवला तालुक्यात 9, दिंडोरी 3, सटाणा, मनमाड, सिन्नर व नाशिक शहरातील प्रत्येकी 1 रूग्णाचा सामावेश आहे.

तर जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा 665 वर पोहचला आहे. नाशिक शहरात करोनाग्रस्तांचा आकडा 39 झाला आहे. आज पाटीलनगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दोघांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. उर्वरीत जिल्ह्यात 73 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. तर यात जिल्ह्याबाहेरील 19 जणांचा समावेश आहे.
मालेगाव येथे करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

तसेच मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. आज मालेगाव परिसरातील मृत्यू झालेल्या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर नाशिक शहरात दोन मृत्यू झाले आहेत. यामध्ये बजरंग वाडी येथील एका गर्भवती महिलेचा तसेच कोणार्क नगर परिसरात राहत असलेल्या 51वर्षीय पोलीसाचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात एकुण करोना बळींचा आकडा 28 झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 34 हजार 506 रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 5हजार 805 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 4 हजार 607 निगेटिव्ह, 665 पॉझिटिव्ह आले आहेत. 796 संशयित रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 533 अहवाल प्रलबिंत आहेत. 63 जण पुर्ण बरे होऊन मुक्त झाले आहेत.

* एकूण कोरोना बाधित: 665
* मालेगाव : 534
* नाशिक : 39
* एकूण मृत्यू: 28
* कोरोनमुक्त : 63
* उर्वरित जिल्हा : 73

24 तासात चौघा संशयितांचा मृत्यू झाल्याने संशयित मृत्यूची संख्या 62 वर पोहचली.आज दिवसभरात वीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेच्या धावपळीत अधिक भर पडली.

असुविधा / निकृष्ट जेवणाची तक्रार

म्हालदे घरकुल योजनेत असलेल्या सेंटरमध्ये अस्वच्छता तसेच असुविधा व निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते गरम पाणी सुद्धा मिळत नसल्याची तक्रार आज व्हिडिओद्वारे करोणा बाधित रुग्णांनी व्हायरल केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विविध पक्ष संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

रुग्णांना घरी सोडले

करोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने दहा दिवसापासून आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणात उपचार घेत असलेल्या 62 रुग्णांमध्ये करोणाची लक्षणे दिसत नसल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले हे सर्व रुग्ण पुढील सात दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे काही त्रास जाणवल्यास त्यांनी त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले गेले मन्सूरामधून 25 तर म्हालदे सेंटर 21 तर फाराण रुग्णालयातून 17 रुग्ण शासनाच्या नवीन धोरणानुसार आज घरी सोडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या