Type to search

देशभरात असा साजरा होतो मकरसंक्रांतीचा सण

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

देशभरात असा साजरा होतो मकरसंक्रांतीचा सण

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश याच काळात करतो त्यामुळे मकर संक्रांत म्हटले जाते.

हा सण देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक उत्साहात साजरी होतो. भारताबाहेरील देशातील मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात नेपाळमध्ये थारू (Tharu) लोक – माघी, अन्य भागात माघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ सक्राति (Maghe Sakrati), थायलंड – सोंग्क्रान (Songkran), लाओस – पि मा लाओ (Pi Ma Lao), म्यानमार – थिंगयान (Thingyan) अशा नावांनी हा सण साजरी केला जातो.

तर देशात तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरात आणि राजस्थानमध्ये उतरायण, आसाममध्ये भोगली बिहू,  हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये हा सण लोहरी नावाने साजरी होतो. जाऊन घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती.

पोंगल (तामिळनाडू)

तमिळनाडूत मकरसंक्रांत सण पोंगल नावाने साजरी केला जातो. हा सण तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते. पोंगलच्या दिवशी स्नान करून अंगणात मातीच्या नव्या भांड्यात खीर बनवली जाते. त्याला पोंगल असे म्हणतात.

त्यानंर सूर्याला नैवैद्य दाखविला जातो. मग ही खीर प्रसाद म्हणून लोक भक्षण करतात. या दिवशी मुलगी व जावयाला घरी बोलावून त्याचे आदरातिथ्य केले जाते. तिसऱ्या दिवशी घरातील जनावरांना सजविले जाते. त्यांची मिरवणूक काढली जाते. पोंगल या उत्सवात मुलींचे खूप महत्त्व आहे.

उतरायण (गुजरात आणि राजस्थान)

मकर संक्रांति सण गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्रायण नावाने साजरी केला जातो. या सणाला पतंगनो तहेवार म्हणजेच मराठी पतंगांचा सण असे म्हटले जाते.

गुजरात व राजस्थानमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातमध्ये या दिवशी गहू, बाजरीच्या खिचडी बनवल्या जातात.  या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजरातला भेट देतात.

लोहरी  (हिमाचल प्रदेश आणि पंजाब)

मकर संक्रांत हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये लोहडी किंवा लोहळी या नावाने ओळखला जातो. याठिकाणी यादिवशी पंजाब , हरियाणा या भागात संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात.

शेकोटीसाठी लाकड किंवा लाकूड विकत घेण्यासाठी देणगीस्वरुपात पैसे जमा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीच्या देवीची पूजा करतात.

भोगली बिहू (आसाम)

आसाममध्ये मकरसंक्रांती भोगली बिहू नावाने साजरी करतात. भोगली बिहूचा अर्थ खानपानची या दिवसांत चंगळ असते म्हणून हा सण या नावाने ओळखला जातो. याकाळात पोम्पाकडून अन्न तयार केले जाते आणि विविध प्रकारचे अन्न तयार करून दानदेखील केले जाते.

भोगली किंवा मग बिहुचा पहिला दिवस उरुका म्हणून ओळखला जातो. या दिवशी लोक धान्याच्या पेंढामधून तात्पुरते अन्न आणतात यास भेलघर म्हणतात. शिबीरस्वरुपात 4 बांबू बांधून एकत्र अन्न शिजवतात. याठिकाणी गावातील लोक जेवण करतात. बिहू सणाच्या दिवशी आनंद व्यक्त करण्यासाठी अनेकलोक नृत्य करतात. नारळाचे लाडू, तीळ, तूप घालून पारंपरिक पाककृती बनविली जाते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!