Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

राज्यातील ‘या’ प्रमुख लढतींकडे असेल सर्वांचेच लक्ष; थोड्याच वेळात कल हाती येण्यास होणार सुरुवात

Share

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या निकालांना थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. एक्झिट पोलमधून महाराष्ट्राचा कल भाजप आणि महायुतीकडे दिसला असला तरी ७९ वर्षांच्या तरुण तडफदार शरद पवारांच्या सभांनी भाजपसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आणला होता. राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. त्याबाबत सर्वांनाच उत्सुकता असून थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात होणार आहे.

पहिली लढत : प्रचंड चुरशीची आणि प्रतिष्ठेची

1. परळीकरांचा कौल कुणाला? पंकजा की धनंजय मुंडें?

परळी मतदारसंघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरुद्ध महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यात होणाऱ्या थेट लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

2. रोहित पवार की राम शिंदे?

विद्यमान आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या दोघांपैकी जनता कोणाला कौल देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

3. नितेश राणे की सतीश सावंत?

भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही महायुतीचे उमदेवार आमने-सामने असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

4. चंद्रकांत पाटील कि किशोर शिंदे?

कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले. तर दुसरीकडे मनसेचे किशोर शिंदे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही लढत जरा रंजक झाली आहे.

5. उदयनराजे की श्रीनिवास पाटील? :

विधानसभा निवडणुकांबरोबरच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक झाली. दरम्यान अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम करणारे उदयनराजे बाजी मारतात की, श्रीनिवास पाटील. याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!