Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कामगारांनो सावधान; तुमचीही होऊ शकते फसवणूक; महिंद्रा कंपनीतील भरतीचा ‘तो’ मॅसेज खोटा

Share

सातपूर | प्रतिनिधी 

करोनाच्या उद्रेकानंतर कामगारांनी मुळगावी स्थलांतर केले आहे.  यापार्श्वभूमीवर नाशिक मध्ये बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळलेल्या नागरिकांना खोट्या भरतीची माहिती देत अनेक संदेश सध्या सोशल मीडियात  व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी व्हायरल झालेली भरतीची जाहीरात पूर्णपणे खोटी असून याचा कंपनीशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या संदेशांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिस आणि संबंधित कंपनीकडून करण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती कामगारांना काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याची शक्यता वाढली आहे.

अनेक वेळा अडचणीच्या काळात लोकांना कर्जाचे, लॉटरीच्या पैशाचे, घराचे अथवा रोजगाराचे आमिष दाखवून गंडवण्याचे प्रयत्न होत असतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारांची वाढलेली संख्या बघता सोशल मीडियातून ठगबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. संपर्काचे जलद माध्यम म्हणून समजल्या जाणाऱ्या हॉटसअपवर काही लिस्ट व्हायरल होत असून अनेकजन याठिकाणी चौकशी करताना नजरेस पडत आहेत.

यावेळी कंपनीकडून एक पगार, किंवा ठराविक फी देण्याचे गळ काहींना घातली जाते आहे. तसेच आपल्या बँकेच्या डिटेल्स मागवून यातून फसवणूक केल्याहीही घटना घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांपासून दूर राहावे.  कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, तसेच शहनिशा करूनच आर्थिक व्यवहार करावेत असे आवाहन केले जात आहे.


महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत स्वतःचे 2300 कामगार आहेत. तितकेच कंत्राटी व रोजंदारीवर कामगार काम करत असतात. कंपनीने उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पंधराशे कामगारांची परवानगी घेतली आहे. याचा अर्थ कंपनीचे अतिरिक्त मनुष्यबळ अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत असताना नवीन नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील  असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे.


महिंद्रा कंपनीत नोकर भरती ही जाहिरातीच्या माध्यमातून अतिशय तांत्रिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे अशा पध्दतीने भरती होत नाही, अशा खोट्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये व त्यातून होणारी आपली फसवणूक टाळावी.

प्रदीप देशमुख 
उपाध्यक्ष महिंद्रा महिंद्रा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!