Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थच्या अध्यक्षपदी महेश गाडेकर

Share

गवळवाडी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करवून देणार

नाशिक : प्रतिनिधी

समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून समाज सेवेचा वारसा पुढे नेण्याचे वचन देत विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी झेप उपक्रमांतर्गत पूर्ण मोटाराईज्ड हात तसेच क्लबने दत्तक घेतलेल्या गवळवाडी (ता. दिंडोरी) शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करवून देत स्मार्ट शिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगत रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून महेश गाडेकर यांनी वर्ष 2019-2020 या वर्षासाठी पदभार स्विकारला. तर सचिव पदासाठी उमेश राठोड यांनी शपथ घेतली.

समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचा वर्ष 2019-2020 वर्षासाठी असलेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवारी (दि. 25) हॉटेल व्हेज आरोमा येथे पार पडला.

प्रमुख पाहुणे पीडिजी महेश मोकाळकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकारींना रोटरीचे पद चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहसचिव पदी राजेश सिंघल, प्रशांत सारडा, खजिनदार पदी गीता पिंगळे, निरीक्षण अधिकारी पदी सुशांत जाधव, योगराज राजपूत, नियोजन अधिकारी पदी राजेंद्र धारणकर, इतर समित्यांची जबाबदारीसाठी जयंत भिंगे, नाना शेवाळे, प्रशांत हाटेकर, अशोक सोनवणे, परेश महाजन, किरण सरोगे यांनी शपथ घेतली.

यावेळी मोकाळकर यांनी, समाजसेवेत जीवनाचा खरा आनंद असून रोटरी क्लब हे कार्य करताना सोबत असल्याचे समाधान आहे. आईचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर स्मशान भूमीत सुचलेल्या संकल्पनेनुसार नागपुर मध्ये मॅमोग्राफी व्हॅन सुरू केली. स्वतःचे व इतर असे सुमारे 1 कोटी रुपये खर्चून स्तनाचा कॅन्सर असलेल्या सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबातील हजारो महिलांना झालेले फायदे बघून आईला नक्कीच आनंद झाला असेल असे मत व्यक्त केले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष महेश गाडेकर यांनी यावर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध समाजपोयोगी उपक्रमाचे माहिती आणि त्याचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्व, निसर्ग संवर्धन, दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धा, टॅलेंट हंट आर्थिक मदती सोबत रोजगार उपलब्ध करवून देणे, महिला आरोग्य तपासणी, सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियान, रक्तदान शिबीर, बॉक्स क्रिकेट, समाजसेवेकरिता उभारल्या जाणाऱ्या निधीसाठी ‘गरबा’ चे आयोजन केले जाणार आहे. पुढे येणाऱ्या सूचनांनुसार नवनवीन उपक्रम सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

पदग्रहण सोहळ्याच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष मनीष ओबेरॉय यांनी गाडेकर यांना रोटरीची कॉलर व बॅच प्रदान करीत अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. सरत्या वर्षी कार्यकारिणीने केलेल्या कामाचा लेखाजोखा ही सादर केला. तर डिजी संदेशाचे वाचन डॉ. मनीषा जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आवेश पळोड आणि अश्विनी जोशी तर उमेश राठोड यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. नितीन लाड, कॅप्टन निखिल खोत, रमेश मेहर, नरेशभाई शाह, गुरमित रावळ, तुषार चव्हाण, सुरेश शिंदे, फडके व इतर मान्यवरांसह रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!