Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पश्चिममध्ये महायुतीत बंडाळी; शिवसेनेचे २१ नगरसेवक भाजप विरोधात उमेदवार देण्याची शक्यता

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

शिवसेना भाजपसह मित्रपक्ष आगामी विधानसभेला महायुती करून सामोरे जात आहेत. मात्र, नाशिक पश्चिमची जगा शिवसेनेला न सोडल्यामुळे नाशिकमधील शिवसेनेचे २१ नगरसेवक बंडाच्या तयारीत असून त्यांच्याकडून आज पश्चिमसाठी उमेदवार देण्याबाबत निर्णय होणार आहे.

पश्चिमची जागा सेनेला न सोडल्याने येथील नगरसेवकांसह कार्यकर्ते नाराज आहेत. येथील इच्छुकांचा युतीच्या निर्णयामुळे हिरमोड झाला. यानंतर, येथील सेनेचे नगरसेवकांची शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे महत्वाची बैठक पार पडत आहेत. यामध्ये विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नगरसेवक मिळून एक उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा मतदार संघ सेनेसाठी सोडण्यात येईल अशी चर्चा होती.  भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर येथील शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांनी एकत्र बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर तिकडे सीमा हिरे समर्थकांच्या गोटात आजच्या बैठकीमुळे खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!