नाशिक, ता. ११ : महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिर नाशिकमध्ये संपन्न झाले. त्यानिमित्त आज शहरात धम्मफेरी काढण्यात आली.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम यांचे जिवंत देखावे यावेळी सादर करण्यात आले. सर्व वयोगटातील बौद्ध भिक्खू या शांतता फेरीत सहभागी झाले.

तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलाचे आचरण आणि डॉ. बाबासाहेबांना अपेक्षीत असलेल्या प्रज्ञा,शील,करुणा यांचा आपल्या जीवनात समावेश करून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे व बौद्ध धर्माची स्वतंत्र अशी ओळख निर्माण व्हावी, तेव्हाच बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने संपन्न होईल हा उद्देश समोर ठेवून भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्यावतीने महाबौध्द धम्म मेळावा व महाश्रमनेर शिबिराचे आयोजन गोल्फक्लब मैदान येथे दि.9 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*