Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर घोंगावतंय वादळ

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर घोंगावतंय वादळ

मुंबई | प्रतिनिधी 

पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे नुकत्याच थैमान  घातलेल्या अॅम्फान चक्रीवादळातून सावरत असल्याचे चित्र दिसत असतानाच महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर चक्रीवादळ हे धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात हे चक्रीवादळ वादळ घोंगावत आहे. अरबी समुद्र आणि लक्षद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. ‘निसारगा’ नावाचा हे वादळ पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी सीमेवर येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

- Advertisement -

‘आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र व लक्षद्वीप भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासात पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासात हे वादळ आणखी मजबूत होऊन त्यांचं रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हे वादळ सध्या उत्तर दिशेने सरकत असून दोन दिवसांत ३ जूनपर्यंत वादळ उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या