Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo/Video : ‘महाजनादेश’साठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; मार्गाच्या दुतर्फा जत्रेचे स्वरूप

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये दाखल झाली आहे. यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी सर्व सोपस्कार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केले आहेत. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली असून यात्रेच्या मार्गात प्रचंड गर्दी झाली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे समुह यात्रेची वाट बघताना दिसून येत आहेत.

महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय आहे. मुख्यमंत्र्यांना उशीर होणार असला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे. पाथर्डी फाटा परिसरात हेविवेट नेत्यांसह कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

महाजनादेश यात्रेच्या आधी शहरातून बाईक रॅली जाणार असून पंचक्रोशीत भाजपप्रेमी कार्यकर्ते बाईक रॅलीसाठी दाखल झाले आहेत. नाशिक पोलिसांनी शहरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

नुकतीच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पाथर्डी फाटा परिसरात भेट दिली असून त्यांनी महाजनादेशच्या वाहनाची तपासणीदेखील केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!