Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘महाजनादेश’च्या सकाळपासून शहरात अटकसत्र; विरोधक आक्रमक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये आज भाजपची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. दुपारी साडेतीन वाजेनंतर या यात्रेला पाथर्डी फाटा परिसरातून सुरुवात होणार आहे. विरोधकांनी काल कांदे फेक, निदर्शनांचा इशारा दिल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शहरातून विविध ठिकाणाहून विरोधकांना ताब्यात घेतले आहे. काही ठिकाणी पोलीसांनी या नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. सत्ताधारी भाजपने सत्तेचा वापर करून पोलिसांच्या माध्यमातून अटक करत लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

माकपचे डॉक्टर डी. एल. कराड यांच्या ऑफिसमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.  आज सकाळी कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर काळे, वसंत ठाकूर व अशोक शेडगे यांना भद्रकाली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच  विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढणारे छात्रभारती महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष, राकेश पवार राज्यसदस्य समाधान बागुल यांना नाशिक पोलिस प्रशासनाकडुन अटक करण्यात आली आहे.

छात्रभारती आज विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्याचीं भेट  करून द्यावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करत होते. त्याआधीच प्रसंगावधान राखून पोलिसांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आजच्या महाजनादेश यात्रेदरम्यान पक्षांचे पदाधिकारी  आंदोलन, घोषणाबाजी करतील यामुळे आज देवळाली परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले , प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे , स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव , शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कैलास खांडबहाले , स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक तालुकाध्यक्ष रतन रतन , आम आदमी युवा आघाडी उ. म. प्रमुख स्वप्निल घिया , आम आदमी युवा जिल्हाध्यक्ष योगेश कापसे , संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रफुल वाघ , संभाजी ब्रिगेड जिल्हा सरचिटणीस विकी गायधनी , सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे , आपले पर्यावरण संस्था सचिन तुपे या सर्व पदाधिकाऱ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन याठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

विरोधकांना अटक केल्यामुळे भाजपविरोधात शहरात वातावरण निर्माण झाले आहे. प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून अनुचित प्रकार टाळण्यासाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!