Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पक्षासाठी निष्ठेने ३५ वर्षे काम केले ‘हो’, तरी पदरी निराशा; नगरसेवक मच्छिंद्र सानप यांना अश्रू अनावर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पक्षासाठी गेली ३५ वर्षे आमच्या वडिलांनी निष्ठेने काम केले. पक्ष संघटन त्यांच्या काळात अधिक वाढले. गेल्या पंचवार्षिकला प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडणून आलो. तरीही पक्षाने उमेदवारी नाकारली असे म्हणत बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र आणि पंचवटीतील नगरसेवक मच्छिंद्र सानप यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांना शिवसेनेचे विलास शिंदे, सुधाकर बडगुजर यांनी धीर दिला.

ज्या पक्षासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जीवाचे रान केले. प्रसंगी वाईपणा देखील ओढवून घेतला. त्याच पक्षाने आज विश्वासघात करत उपऱ्या उमेदवाराला तिकीट दिले असा आरोप सानप यांनी केला. यावेळी सानप यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरदेखील टीका केली.

गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडी झाल्या यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत. तरीदेखील परिस्थिती काहीही असो आम्ही पुन्हा एकदा याच मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडणून येऊ असेही सानप म्हणाले.

सानप यांचं राष्ट्रवादी प्रवेशामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार असून सानप यांच्यापुढे आता मनसेचे अशोक मुर्तडक आणि भाजपचे राहुल ढिकले यांचे आव्हान असणार आहे.

सोशल मिडिया झाला ‘राष्ट्रवादी’

बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सानप यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेत पोस्टरबाजी केली. कालपर्यंत गेली ३५ वर्षे भाजपचे तन मन धन एक करून काम करणाऱ्या भाजपने ऐनवेळी सानप यांचे तिकीट कापले. मात्र, कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!