Type to search

नाशिक मुख्य बातम्या

ज्योतिष्यांनाही कळेना कोण होणार नाशिकचा खासदार! कोकाटेंची वक्रदृष्टी भोवणार; खा.गोडसेंच्या कुंडलीत शनी

Share

नाशिक । प्रतिनिधी

आकाशातील ग्रह, तारे व नक्षत्रांच्या सरळ तिरक्या चालीचे गणिते मांडून ज्योतिष्य दिग्गज राजकीय व्यक्तींचे भाकित वर्तवतात.

मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रणांगणात ग्रहांनी ठाण मांडत अशी काही स्थिती निर्माण केली की, ज्योतिष्यांनाही खासदार कोण होणार हे सांगताना घाम फुटत आहे.

खासदार म्हणून गोडसे की, भुजबळ यावर त्यांनी सटीक भाष्य करणे टाळले असले तरी अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटेंची वक्रदृष्टी कोणाला तरी भोवणार असे संकेत ज्योतिष्यांनी दिले आहे.

नाशिकमध्ये आयोजित दोनदिवसीय राज्य ज्योतिष्य अधिवेशनाचा रविवारी (दि.19) समारोप झाला. यावेळी आलेल्या ज्योतिष्यांनी देश व महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कुंडली मांडत सत्तेची गणिते मांडली. पंतप्रधान मोदी व भाजपासाठी सन 2014 सारखी परिस्थिती नसून त्यांना एकहाती सत्ता मिळणार नाही.

मात्र, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला पसंती देत दिल्लीचा राजमार्गावर‘एनडीए’चा रथ सुसाट धावेल व मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला; तर राहुल यांची पत्रिका जोरात असल्याने ते प्रभावी नेते म्हणून समोर येत आहे.

पण सध्या तरी ते वेटिंग ‘पीएम’असतील अशी भविष्यवाणी त्यांनी केली, तर महाराष्ट्रात युतीला काहीसे ग्रहण लागणार असून, तुलनेत राष्ट्रवादीचे घड्याळ जोरात चालेल, असे त्यांनी सांगितले.

देश व राज्यांचा अंदाज वर्तवत असताना मात्र, नाशिकचा खासदार कोण होणार हे कोडे ज्योतिष्य देखील उलगडू शकले नाहीत.

राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या कुंडलीत शनी व गुरू यांचे भ्रमण असल्याने त्यांना नक्कीच पाठबळ मिळेल; तर खा.गोडसेंसाठी ग्रहमान प्रतिकूल असून त्यांच्या कुंडलीत शनी ठाण मांडून बसल्याचे सांगत धोक्याची घंटा वाजवली.

अपक्ष उमेदवार कोकाटे तापदायक ठरतील मात्र, कोणाला याबाबत ज्योतिष्यांनी मौन बाळगले. नाशिकमध्ये खासदारकीसाठी टशन पहायला मिळेल, हे सांगायला ते विसरले नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!