Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी; सुरगाण्यात अधिक नुकसान

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी; सुरगाण्यात अधिक नुकसान

देशदूत चमू

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उकाड्याला सुरुवात झाली होती. काल काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरीदेखील कोसळल्या होत्या. दरम्यान, आज सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना पावसाच्या सरींनी दिलासा दिला. ग्रामीण भागात मात्र, पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शहरातील सातपूर, त्र्यंबक रोड, नवीन नाशिक परिसर, पंचवटी, आडगाव, मुंबई नाका, नाशिकरोड भागात पावसाने हजेरी लावली. संचारबंदीमुळे शुकशुकाट असलेले रस्ते पावसाच्या सरींनी धुवून निघाले आहे.

देवळाली कॅम्प : अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात

जगभरात कोरोना चे संकट सुर असताना गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे बळीराजा मोट्या संकटात सापडला आहे.     ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष बागेच्या छाटणीच्या वेळेस मुसळधार पावसामुळे द्राक्ष पीक 50 टक्के नष्ट झाले होते. वाचलेली पीक मोठे
कष्ट करून फेब्रुवारी, मार्च मध्ये विक्रीला आले असता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंद झाली, आत्ता देशातील महत्त्वाचे शहरात वाहतूक बंद झाल्याने द्राक्षे पाठविणे कठीण झाले आहे. स्थानिक मार्केट मध्ये देखील अवस्था बिकट झाली. त्यातच अवकाळी पावसामुळे बळीराजा पूर्ण मेटाकुटीला आला आहे. ,या शिवाय काढणीस आलेले गव्हाच्या पिकाचे देखील नुकसान होत आहे. मजूर मिळत नसल्याने उभे पीक सोडून देणे हाच मार्ग शेतकरी वर्गी पुढे शिल्लक आहे, या शिवाय घरातून बाहेर पडणे शक्य होते नसल्याने बळीराजा वर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

सिन्नरला पावसाची हजेरी

सिन्नर शहर व परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान पावसाने हजेरी लावत 15 ते 20 मिनीट शिडकावा करत उन्हाच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या सिन्नरकरांना दिलासा दिला. आज सकाळपासूनच उन्हाचा तडाखा सर्वांनाच जाणवत होता. कोरोनाच्या कर्फ्युमुळे सारेच घरात थांबले असले तरी भाजीपाला, किराणा घेण्यासाठी बाहेर पडणार्‍यांना उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता. तर घरात असलेल्यांना गर्मीमुळे घरात थांबणे अवघड होत होते. या सर्वानांच पावसाच्या या शिडकाव्याने क्षणभर का होईना थोडासा दिलासा दिला.

त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची हजेरी

आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनानंतर विजेची बत्ती गुल झाली होती. त्र्यंबकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज अचानक आलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे काहीसे नुकसान झाले आहे. कोरोना मुळे देशात संचारबंदी सुरु असताना पावसाने अचानक हजेरी लावत शेतमालाचे नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.

बाऱ्हे, आंबोडे परिसरात बेमोसमी पाऊस; घरांचे नुकसान

बाऱ्हे | बाऱ्हे परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. बाऱ्हे परिसरात आज सकाळपासून काहीसे दमट वातावरण होते . सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान अचानक मेघगर्जना वाऱ्यांसह पावसास सुरुवात झाली . या पावसामध्ये आंबोडे परिसरात तसेच झगडपाडा गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या बेमोसमी पावसाने काही शेतकऱ्यांच्या पिकांना कमी अधिक प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सगळीकडे सामसूम असतांना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

देवळा तालुक्यात रिमझिम 

देवळा तालुक्यातही पाच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सुरगाण्यात पावसाने नुकसान

हतगड -सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा,खडकी ,केळवण,आंबोडे, बेडसे ,आदी गावातील घरांचे कौलारू व सिमेंट पत्रेंची,व थोडी तूर शेतीची ३ ते ४ वाजेच्या दरम्यान बे मोसमी पावसाने चक्रीय वादळी वाऱ्याने आंबोडे गावातील नारायण गायकवाड यांचे घराचे पत्रे अन्नधान्य यांचे नुकसान व जवळपास खूप घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे.एकीकडे कोरोना व्हायरस रोग पसरण्याची काळजी तर दुसरीकडे बे मोसमी पाऊस वादळाने केलेल्या घरांची नुकसान नेत्याची काळजी त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तरी शासनाने झालेल्या घराचे नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या