Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एमजी रोडवरील खुन प्रकरणी दोघांना जन्मठेप; गेल्या वर्षी जुन्या भांडणातून झाला होता खून

Share

नाशिक । प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणातून महात्मागांधी रोड येथे झालेल्या खुन प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी दोघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

चेतन पोपट लेवे (20) व सिद्धेश राजू इश्ते (20, रा दोघेही कर्णकनगर, आरटीओ ऑफिस जवळ ) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. तर तिसरा अल्पवयीन संशयितास बाल मंडळ न्यायालयाने बालनिरिक्षण गृहात रवानगी केली आहे.

यामध्ये मनिष प्रेमजी रेवर (23, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याचा खुन झाला होता. ही घटना 21 नोव्हेंबर 2018 रोजी महात्मानगर रोडवर घडली होती.

आरोपी लेवे, इस्ते यांची अडीच वर्षांपुर्वी मनिष रेवर यांच्यासोबत भांडणे झाली होती. २२  नोव्हेंबरला रात्री ९.३० च्या सुमारास मनिष हा आपल्या मित्रांसमवेत महात्मागांधी रोडवरील शिवाजी स्टेडियमच्या बोळीत असलेल्या पान टपरीवर पान खान्यासाठी आला होता.

या दरम्यान तेथे लेवे, इश्ते व विधीसंघर्षीत बालक असे सर्वजन पान टपरी समोरील शाम सिल्क साडी दुकानाच्या समोर मद्य सेवन करून बडबड करत शिवीगाळ करत होते.

मागील भांडणाच्या रागातून ते शिवीगाळ करत असल्याने याचा जाब रेवर याने त्यांना विचारला असता त्यांच्यात वाद झाले. यातून लेवे व इस्ते यांनी सोबत आणलेल्या चाकुने रेवर याच्यावर हल्ला केला.

चेहरा, गाल, नाक तसेच मानेवर वार करण्यात आले या ठिकाणी रक्तस्त्राव होऊन मनिष रेवर गंभीर झाला होता. त्यास प्रथम खासगी व नंतर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरिक्षक भारतकुमार सुर्यवंशी यांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. सर्व साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने दोघा अरोपींना दोषी ठरवत आजन्म कारावास व प्रत्येकी 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न दिल्यास 1 वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे रविंद्र निकम यांनी काम पाहिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!