Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : नासाका कॉलनीत बिबट्याचे दर्शन

Share
कळवण : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; Kalwan : Goat killed in leopard attack

देवळाली कॅम्प । वार्ताहर

पळसे येथील नासाका कॉलनीत रात्री 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट कर्मचार्‍याच्या दरवाजापुढे दर्शन देत ठाण मांडल्याने कर्मचार्‍याची पाचावर धारण बसली.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे, पळसे, एकलहरे, हिंगणवेढे, देवळाली कॅम्प, लहवित, लोहशिंगवे, नानेगाव, शेवगेदारणा या परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे.

रविवारी रात्री पळसे येथील लक्ष्मण मुरलीधर आगळे यांची गाय लीलाबाई रामदास सरोदे यांच्या पडिक क्षेत्रात बांधलेली होती. मध्यरात्री सावजाच्या शोधात असलेल्या बिबट्याने या गायीची शिकार केली. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी वन विभागाला माहिती दिली असता वनरक्षक गोविंद पंढारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

या घटनेमुळे मळे विभागातील नागरिक धास्तावले असून रात्री 7 वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळले जात आहे. त्यातच सोमवारी सायंकाळी 7 वाजता कारखाना कॉलनीतील सी टाईप येथे नंदकुमार नरवडे यांच्या घराच्या पायरीवर बिबट्याचे बस्तान मांडले. नरवडे हे दरवाजा उघडून बाहेर येत असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले व त्यांनी तात्काळ दरवाजा बंद करत शेजारील रहिवासीयांना मोबाईलवर माहिती दिली.

येथील युवकांनी फटाके फोडल्याने बिबट्याने ऊसाच्या क्षेत्राकडे धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वाढलेला संचार धोकादायक बनत असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्यात यावे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!