Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : जखमी बिबट्याच्या बछडयाचा उपासमारीने मृत्यू; शेवगे दारणा येथील घटना

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक पश्चिम वन विभागाच्या त्र्यंबकेश्वर वन क्षेत्रातील शेवगे दारणा येथे जनावरांच्या गोठ्यात मृत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आज सकाळी येथील शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी वनविभागास माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे पथक बचावकार्यालासाठी दाखल झाले होते.  मात्र, या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या मानेजवळ गेल्या काही महिन्यांपासून गंभीर दुखापत झाली असल्याचे निदर्शनास आले. तसेच उपासमारीने मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी शेवगे दारणा येथील मळे वस्तीत जनावरांच्या गोठ्यात बिबट्या आढळून आल्याचे येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.
येथील गजीराम ढोकने यांच्या वस्तीवर ही घटना घडली. या घटनेची तात्काळ माहिती वनविभागास देण्यात आली. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची टीम घटनास्थळी गेली असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत मिळून आला.

वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक येथे बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यात बिबट्याला गंभीर दुखापत झालेली असल्याचे समोर आले तर उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नियमित संचार असलेल्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!