Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बेळगाव कुऱ्हे : शेणीत शिवारात अपघातात बिबट्याचे बछडे ठार

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील शेनीत शिवारात आज पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ते तीन महिन्याचे बिबट्याचे बछडे ठार झाले.

मानवाने केलेली मोठ्या प्रमाणात जंगलतोड आदी कारणांमुळे वन्यजीव मानव वस्तीत भक्ष्य शोधण्यासाठी येतात. परिसरात जंगली श्वापदांचा वावर परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभराच्या कालावधीत पाडळी देशमुख, वाडीवऱ्हे, साकुर महामार्गावर देखील बिबट्यांचा अज्ञात वाहनांच्या धड़कने मृत्यू झाला होता.

ही बाब अतिशय गंभीर असल्याचे पिंपळगाव घाडगाचे प्राणी मित्र अनिल गवळे यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थानी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव, वनरक्षक फैजाली सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मयत बिबट्याच्या बछड्याची उत्तरीय तपासनी टाकेदच्या पशुवैधकीय अधिकारी डॉ जयश्री तळपाडे यांनी केल्यानंतर टाकेद येथील वन परिमंडळ कार्यालयाच्या आवारात बिबट्याच्या बछड्याचे अग्निदहन करण्यात आले. यावेळी वनरक्षक मालती पाडवी, श्रावण निर्गुडे, भोराबाई खाडे, संजय मेंगाळ आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!