Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : बिबट्याच्या बछडयाची आईसोबत भेट होते तेव्हा…

Share

नाशिक | प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील येवला रेंज पूर्वभागात प्रतापराव पुंड यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे पाच महिने वयाचे एक बिबट्याचे बछडे पडले होते. बछडयाला गेल्या आठवड्यात शनिवारी (दि. 10) रोजी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बछडयाला त्याच्या आईकडे म्हणजेच मादीकडे सोपविण्यासाठी वनविभागाकडून अहोरात्र प्रयत्न केले जात होते.

बिबट्याच्या बछडयाची आईसोबत भेट होते तेव्हा…

गाजरवाडी (ता. निफाड) येथील येवला रेंज पूर्वभागात प्रतापराव पुंड यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे पाच महिने वयाचे एक बिबट्याचे बछडे पडले होते. बछडयाला शनिवारी (दि. 10) रोजी बाहेर काढले होते. दरम्यान, बछडयाला त्याच्या आईकडे म्हणजेच मादीकडे सोपविण्यासाठी वनविभागाकडून अहोरात्र प्रयत्न केले जात होते. दरम्यान, मादी तलावाजवळ आपल्या बछडयाला बघण्यासाठी येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजले. दरम्यान मादी येत होती मात्र, बछडयाला तिच्या ताब्यात देण्यासाठी वनविभागाला अपयश आले होते. मात्र, पुन्हा एकदा नियोजनबद्ध कामाचा नमुना सादर करत आयपी कॅमेरा सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून अखेर बछडयाला आपल्या आईसोबत भेट घालून दिली.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

दरम्यान, मादी तलावाजवळ आपल्या बछडयाला बघण्यासाठी येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजले. मादी येत होती मात्र, बछडयाला तिच्या ताब्यात देण्यासाठी वनविभागाला अपयश आले होते.

मात्र वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत पुन्हा एकदा नियोजनबद्ध कामाचा नमुना वनविभागाने सादर केला.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वनविभागाने आयपी कॅमेरा सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून बछडयाची आपल्या आईसोबत भेट घालून दिली. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!