सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकवणारे ‘डावखुरे’

0
अशोक निसाळ | 13 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त भारतातील डावखुरे असणार्‍या भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणार्‍या व्यक्तींविषयी टाकलेला प्रकाशझोत.

एखादे मूल जन्माला आले की, जसजशी त्याची वाढ होऊ लागते तेव्हा त्याच्या सवयीनुसार लिखाण, खानपान, खेळ यावरून ते मूल डावखुरा आहे की उजवा हे कळते. काही लोक डाव्या हाताने काम करणे अशुभ किंवा चुकीचे मानत असतात. लहानपणी मुलांना उजव्या हाताने काम करण्याची जबरदस्तीने सवय लावली जाते. मात्र, प्रगतीचा आलेख पाहता डावखुरे व्यक्तींनी आपल्या कलेच्या जोरावर भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकविण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे.

आजपर्यंत डावखुरे म्हणून ज्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले, त्यापैकी पहिले नाव महात्मा गांधी, त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न पुरस्कारप्राप्त मदर तेरेसा, उद्योजकमध्ये रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, क्रिकेटरमध्ये विनोद कांबळी, अजित वाडेकर, युवराज सिंग, झहीर खान, सुरेश रैना, शिखर धवन, गांगुली, महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंदाना तर अभिनेत्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, अभिनेत्रीमध्ये सोनाक्षी सिन्हा, सनी लियोन, गायकमध्ये पंकज उदास, आशा भोसले, बॅडमिंटनमध्ये ज्वाला गुट्टा, बॉक्सिंगमध्ये मेरी कॉम आदींची नावे घेतले जातात.

डावखुर्‍या व्यक्तींची बुद्धी प्रगल्भ असते. वरील व्यक्तींवरून दिसून येते. डावखुरे लोकांची विचारशक्ती फार जलद असते. माहितीचे विश्लेषण करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त क्षमता असते. खास करून डावखुर्‍या व्यक्तिंमध्ये भिन्न विचार करण्याची क्षमता उजव्यापेक्षा अधिक असते.

क्रिकेटचा महान फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन उजव्या हाताने फलंदाजी करतो हे सर्वपरिचित आहे. मात्र, लिखाण तो डाव्या हाताने करतो. तसेच कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा आपल्या कलाकारीने लोकांवर छाप पाडली आहे.

डावखुरे व्यक्तिंमध्ये काहीतरी विषेश गुण असतो. त्या जोरावर ते कामयाबी हासील करतात. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर यावरून असे दिसून येते की डावखुरे व्यक्ती काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकन उद्योजक मार्क झुकरबर्ग हासुद्धा डावखुरा असून त्यांनी फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशोगाथा सर्वांना माहिती तर आहेच, असे अनेक उदाहरणे आहे. जे डावखुरे असूनही त्यांनी यशप्राप्तीचे शिखर सहज गाठले आहे, आणि भारताचा झेंडा सातासमुद्रापार नेला आहे.

LEAVE A REPLY

*