Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदिंडोरी : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

दिंडोरी : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

दिंडोरी । वार्ताहर

ननाशी – दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकऱ्यावर शेतात काम करत असतांना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे .या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,तालुक्यातील बाडगीचापाडा येथील शेतकरी सीताराम अमृता कनोजे ( वय ६५ ) हे आज ( दि .१० ) बाडगीचापाडा शिवारातील आपल्या शेतात काम करत असतांना दुपारी एक वाजेच्या दरम्यान अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला चढवला पण या वयोवृद्ध शेतकऱ्याने निकराने प्रतिकार केला.

- Advertisement -

या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात कनोजे यांच्या कपाळावर डाव्या भुवईच्या वरती गंभीर दुखापत झाली आहे .दरम्यान यावेळी कनोजे यांनी आरडा ओरड करीत परिसरात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या .त्यावेळी आरोळ्या ऐकून परिसरातील इतर शेतकऱ्यांनी कनोजे यांच्या शेताकडे धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले .तसेच तातडीने कनोजे यांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले .तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर उपचार केले . कनोजे यांच्या डाव्या भुवईच्यावर जखम झालेल्या ठिकाणि सहा टाके पडले आहेत.

ननाशी परिसर तसा बिबट्याचे माहेरघर पण गेल्या चार ते पाच वर्षांपासून परिसरात बिबट्याचा उपद्रव नव्हता परंतु आता पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असून परिसरात अनेक शेतकरी मळ्यात वस्ती करून राहतात आणि दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला झाल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली असून वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या