दारणामाई फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा इंद्रायणी तांदूळ विक्रीसाठी रवाना

jalgaon-digital
2 Min Read

बेलगाव कुऱ्हे । लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव  येथे कृषी विभाग आत्माच्या संयोगाने  नवीनच स्थापन  झालेल्या दारणामाई शेतकरी उत्पादक कंपनीने भातावर प्रक्रिया केलेला तेरा लाखाचा  तीस  टन इतका इंद्रायणी तांदूळ कृषी विभागाच्या अथक परिश्रमाने जळगाव येथे  विक्रीसाठी  नुकताच रवाना करण्यात आला.  कृषी विभागाच्या मदतीने शेतकरी उत्पादक कंपनीला  कोरोना काळात नवसंजीवनी मिळाल्याने  त्यांनी समाधान व्यक्त केले.

काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील कुऱ्हेगाव  येथील सप्तशृंगी कृषी बचत गटाने  २१ गटांना एकत्र करीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्प व आत्माच्या संयुक्त विद्यमाने भात उत्पादित मालावर प्रक्रिया करणारी  दारणामाई शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली मात्र शेतकऱ्यांना करोना संक्रमणामुळे मोठा तोटा सहन करावा लागत होता.  तयार तांदुळ शेतकऱ्यांकडे  पडून राहिल्याने सर्वच  हतबल होते. यातच भात उत्पादन मालाचा उठाव देखील होत नसल्याने  अशा बिकट परिस्थितीत शेतकरी उत्पादक कंपनी सापडलेली होती.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  संजीव पडवळ  यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी  शीतलकुमार तंवर यांनी जळगाव येथे संपर्क साधून कुऱ्हेगाव येथील उत्पादित केलेला इंद्रायणी  तांदळाचीे जळगाव जिल्ह्यातील ऑर्डर  कंपनीला मिळण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे सदर कंपनीला पंधरा लाख रुपये किमतीच्या तांदुळाची ऑर्डर मिळाल्याने त्यांनी कृषी विभागाचे आभार मानले.

शेतकरी उत्पादक कंपनीतून दहा टन तांदळाचा पहिला ट्रक आज आमदार हिरामण खोसकर, जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे व्हाईस चेअरमन  संदीप  गुळवे , कंपनीचे सदस्य यांच्या उपस्थितीत जळगावला नुकताच रवाना करण्यात आला.  शेतकरी उत्पादक कंपनीस फायदा झाल्याने आत्माचे प्रकल्प उपसंचालक हेमंत  काळे,  शिरसाठ यांनी   शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी  शिंदे, कृषी पर्यवेक्षक  चंद्रशेखर अकोले , कृषी सहाय्यक विनोद सांगळे, कंपनीचे अध्यक्ष  भाऊसाहेब धोंगडे ,  संचालक जगन धोंगड,हरिभाऊ गतीर, विश्वास धोंगडे,  बाबुराव धोंगडे,  भाऊसाहेब धोंगडे , भगवान धोंगडे आदी  उपस्थित होते.

करोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे  तांदूळ शिल्लक  होता  मात्र कृषी विभागाच्या मदतीने शेतकरी ते ग्राहक या तत्वावर जळगाव येथे इंद्रायणी तांदूळ पाठवण्यात आला. भविष्यात शेतकरी ते ग्राहक याच तत्वावर कंपनी काम करणार आहे.
भाऊसाहेब धोंगडे, अध्यक्ष दारणमाई शेतकरी उत्पादक कंपनी

महाराष्ट्र स्पर्धाक्षम विकास प्रकल्प व आत्माच्या संयोगाने  शेतकरी गटास दिलेल्या राईसमिल मुळे प्रक्रिया होवुन जादा दर मिळु शकतील
शेतकरी एकत्र येवून भाताच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करीत आहे. कोरोनाच्या संकटात देखील शेतकरी हितासाठी शासन योजना प्रभावीपणे काम करीत आहे
हेमंत काळे , प्रकल्प उपसंचालक आत्मा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *