Friday, April 26, 2024
Homeनाशिकनांदगाव : चेक पोस्ट वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला

नांदगाव : चेक पोस्ट वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील नाशिक – जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर अमोदे येथे चेक पोस्ट वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिसात दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून लोकसेवकास मारहाण करणे , साथरोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक – जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर अमोदे येथे चेक पोस्ट वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडला आहे. पो.ना.अनिल शेरेकर आणि पो.कॉ. एस.व्ही.बागुल हे अमोदे येथे चेक पोस्टवर कर्तव्यावर असतांना सायगाव बगळी येथील काही लोक दुचाकीवरून येथे आले आणि नांदगाव कडे जाऊ देण्यासाठी आग्रह केला परंतु त्यांच्याकडे आवश्यक वैध असा पास नसल्याने त्यांना परवानगी दिली नाही.

सायंकाळच्या सुमारास काही लोक याठिकाणी आले व आमच्या गावातील लोकांना अडवू नका त्यांना विना पासचे जाऊ द्या म्हणून पोलिसांबरोबर वादविवाद घालण्यास सुरुवात केली याचे पर्यवसन पोलिसांना हाणामारीत झाले या हाणामारीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या