सायकलवारीचे उत्साहात स्वागत

आस दर्शनाची : ४०० सायकलिस्टचा सहभाग

0

सिन्नर | वार्ताहर नाशिक सायकलिस्ट असोशीएशनच्यावतीने आयोजित नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे काल (दि.१३) सकाळी ७ वाजता एल ऍण्ड टी फाटा येथील बायपासवर सिन्नर सायकलिस्ट ग्रुपच्यावतीने स्वागत करण्यात आले.

सुमारे ४०० सायकलपटू या वारीत सहभागी झाले असून त्यात सिन्नर येथील ५० सायकलिस्टचा समावेश आहे. सायकलवारीचे यंदा ७ वे वर्ष असून तीनचाकी सायकलवर साकारण्यात आलेला रथ यंदाचे आकर्षण ठरला. बायपास फाट्यावरील उडपी इडली हॉटेल येथे या अनोख्या वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले.

सिन्नर सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संदीप मोरे, कार्याध्यक्ष रामभाऊ लोणारे, समाधान गायकवाड, बाळासाहेब डागा, महेंद्र कानडी, सुभाष कुंभार, संदीप ठोक, दिलीप लहामगे, मुकेश चव्हाणके यावेळी उपस्थित होते.

वृक्षारोपण आणि शुन्य प्लॅस्टीक हा विषय घेऊन ही सायकल वारी आयोजित करण्यात येते. सिन्नर येथून स्वागत आटोपल्यावर नांदूरशिंगोटे, निमोण, तळेगाव दिघे, कोल्हार, राहूरी असा प्रवास करत अहमदनगर येथे ही सायकल वारी मुक्कामाला पोहचली. रविवारी (दि.१५) सकाळी पंढरपूरात दाखल होत हे वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत.

प्लस्टीक मुक्तीचा नारा
नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्यावतीने काढण्यात येणार्‍या या आगळ्या-वेगळ्या सायकलवारीत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील सायकलिस्ट सहभागी होत असतात. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हे सायकलिस्ट वारी मार्गावर प्रबोधनाचे काम करत आले आहे. वृक्षसंवर्धन आणि झिरो प्लॅस्टीक हा विषय घेऊन यंदा आमची वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे. वारीच्या मार्गात ठिकठिकाणी वृक्षरोपण करण्यात येणार आहे. याशिवाय प्लॅस्टिकचा केला जाणारा वापर कशाप्रकारे घातक या विषयी प्रबोधन करुन प्लॅस्टिक मुक्तीचा उद्देश लोकांना पटवून दिला जाणार आहे.- मुकेश चव्हाणके

LEAVE A REPLY

*