सातपूर पोलीसांद्वारे सिमकार्ड विक्रेत्यांना सूचना

0
सातपूर | प्रतिनिधी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतसिम कार्ड विक्री करणार्‍या व्यवसायीकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, यात कुचराई केल्यास कारवाईचा करणार असल्याचा इशारा वरिष्ठ निरिक्षक राजेंद्र कुटे यांनी दिला.

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या बैठकीत सहाय्यक निरिक्षक संदिप वर्‍हाडे, उपनिरक्षिक शांतिलाल चव्हाण, मेजर विवेक भदाणे हे होते. यावेळी श्री कुटे यांनी नवीन सिम कार्ड धारकांना विक्री करताना सिम घेणार्‍याची खात्री करून घ्यावी.

सिमकार्ड घेणार्‍याचे नाव, पत्ता व आधार कार्ड नंबर खात्री करून घ्यावा, अल्टरनेट नंबर व नवीन सिम विक्री केल्याचा क्रमांक पोलीस ठाण्यात माहिती देतांना द्यावा, राज्य व देशात अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. खोल्या, बंगले, शेड गाळे भाडेतत्वावर घेण्यासोबतच बनावट आधारकार्ड, ओळख पत्र तयार करून नविन सिम विकत घेण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सिमकार्ड विक्री करतांना सिमधारकाच्या कागदपत्रांची तसेच फोटोची पडताळणी करावी, त्या व्यक्तीस समक्ष बघुनच सिमकार्ड द्यावे, दुसर्‍यांचे आधार कार्ड घेवून आल्यावर तिर्‍हाईत व्यक्तीस सिम देऊ नये, आपण विक्री केल्या सिम कार्डची माहीती तुम्हाला दिलेल्या तक्यात भरुन पोलीस ठाण्यात प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला सादर करावी,माहीती वेळेत न दिल्यास व्यवसायीकाविरूध्द भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे कादेशीर कारवाई येईल असा इशारा दिला.

LEAVE A REPLY

*