मोकट कूत्र्यांच्या त्रासाने कामगार चिंतीत

0
सातपूर | दि. १८ प्रतिनिधीऔद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी जाणार्‍या कामगारांच्या वाहनांवर वायमारी कररार्‍यांची नजर यापूर्वी होती. मात्र आता मोकाट कूत्र्यांच्या संघटीत ‘ऍटॅक’मुळे कामगार वर्गात भितीचे वातावरण आहे.
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कूत्रांचा सि वाढला आहे. रात्री अपरात्री कामावरुन परतणार्‍या कामगारांवर एकत्रितपणे चाल करण्यामुळे सायकलस्वारांची गाळणच उडत असते.

कार चालकांना याचा त्रास होत नाही मात्र सायकल स्वार व मोटरसायकल स्वाराच्या मागे धावण्याची जणू त्यांची शर्यतच लागलेली असते. या धावपळीत समोर काही अडथळा अचानक आल्यास कामगाराचा अपघात निश्‍चित आहे.

त्यामुळे प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील या मोकाट कूत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी कामगार संघटनांद्वारे करण्यात आली आहे.

अनेक कारखान्यांमध्ये रात्रपाळीत काम चालते. त्यामुळे रात्री कामावर जाताना या कुत्र्यांच्या त्रासला कामगारांना सामोरे जावे लागते. गरीब वर्ग असल्याने सायकलशिवाय पर्याय राहत नाही कामावर जाणे गरजेचे सोबत हा धोका कायम असल्याने त्यांची अडचण होते.
-उत्तम खांंडबहाले (युनियन अध्यक्ष महिन्द्र सोना)

LEAVE A REPLY

*