ओझरला शिवसेनेचे अनोखे आंदोलन

गांधीगिरी पद्धतीने बसवाहकाचा केला सत्कार

0
ओझर|वार्ताहर येथील दररोज हजारो प्रवाशांना होणार्‍या त्रासाबद्दल शिवसेनेने गुरुवारी भरपावसात आंदोलन करीत एस.टी बस स्थानकात आणून चालक वाहकांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

तिकीट ओझरचे पण बाहेर उतरा महामार्गावरच. अशा घरगुती नियमात सटाणा, साक्री, मालेगाव, नंदुरबार आदींसह अनेक आगाराचे वाहक- चालकांच्या दंडेलशाहीला ओझरकर नागरिक पुरते वैतागले होते. त्यात बहुतेक एस.टी बसेसचे आणि ओझरकरांचे नेमके काय बिघडले आहेत ते न समजण्यापलीकडे गेल्याने सर्वच प्रवाशांना भर वर्दळीच्या ठिकाणी उतरवून देत सुसाट गाड्या नेणार्‍या चालकाला नागरिकांच्या संतापला सामोरे जाण्याची वेळ आली.

रीतसर ओझरचे तिकीट देवून काही आगाराचे चालक वाहक भर महामार्गावर प्रवाशांना उतरवून सुसाट निघून जात आहे. यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत असतांना गुरुवारी रात्री एका महिलेने पाऊस चालू असल्याने बस स्थानकात नेण्याची विनंती केली त्यावर तुम्हाला येथे उतरावे लागेल असा सज्जड दम त्या वाहकाने दिला.

त्यावर सदर महिलेने ओझरला संपर्क केला असता तात्काळ गडाख कॉर्नर येथे भरपावसात शिवसैनिक जमा झाले. बसचालकाला जाब विचारण्यात आल्यानंतर सदर बस आम्ही स्थानकात नेतच नाही असा अजब तर्क महाशयांनी लावला.

परंतु महामार्गावर सुरु असलेल्या आंदोलनापुढे शेवटी चालकाने माघार घेत चूक कबुल केली. त्यावर त्यांचा गांधीगिरी पद्धतीने स्थानकात सत्कार करण्यात आला. यापुढे रितसर ओझरचे तिकीट देवुन स्थानकात गाडी न आणल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जि.प. सदस्य दीपक शिरसाठ, शहरप्रमुख नितीन काळे, दीपक जाधव, अमोल खाडे, दीपक कदम, तेजस बोरा, प्रदीप भागवत, योगेश शिंदे, रोहित लभडे, तुषार कदम, दिनेश सवाने, राहुल शेळके, प्रशांत इंगळे आदींसह ओझर परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*