महापालिकेत प्रशासकीय राजवट का?

0

नाशिकरोड | प्रतिनिधी  प्रभाग समिती सभापती व नगरसेवकांना कोणत्याही प्रकारच्या कामांबाबत पाठपुरावा करण्याचा अधिकार नसल्याने मनपात प्रशासकीय राजवट आहे की काय? अशी चर्चा नगरसेवकांमध्ये होत आहे.

तुकारात मुंडे यांनी आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर नगरसेवकांच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात गदा आली असून अनेक नगरसेवक नाराज असल्याचे दिसून येते. प्रभाग सभापती व नगरसेवक हे केवळ शोभेचे पद आहे का, असा सूर ऐकायला मिळत आहे.

प्रभाग समितीच्या बैठकीत यापुर्वी ५ लाखापर्यंतच्या विकास कामांना मान्यता मिळत असे. परंतु आता कोणत्याही प्रकारच्या विकास कामांचे प्रस्ताव विभागीय बैठकीत मांडता येणार नसल्याने बैठकीचे आयोजन कशाला करायचे, असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे छोट्या ठेकेदारांना मनपातून हद्दपार होण्याची वेळ येणार आहे.

यापुढे नाशिकरोड विभागातील सहा प्रभाग मिळून विविध विकास कामांना मंजूरी मिळणार असल्याने मोठ्या ठेकेदारांनाच त्याचा फायदा होणार आहे. मनपाच्या येथील नगरविकास कार्यालयाचे स्थलांतर नाशिक येथील मुख्य कार्यालयात करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून दुर्गा उद्यान येथे मनपाची नूतन इमारत बांधण्यात आली. परंतु येथे बरेच कार्यालय रिकामे आहेत. नगरविकास कार्यालय पुन्हा नाशिकरोडमध्ये सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

नगरसेवक जनतेतून निवडून येत असल्याने विकास कामे करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. परंतु प्रशासनातर्फे नगरसेवकांच्या अधिकारांचे अवमुल्यन करण्याचे पातक होत आहे. प्रभाग सभापतींसह नगरसेवकांना विकास कामे करण्याचा अधिकार नसल्याने यात जनतेचे नुकसार होणार आहे.
पंडीत आवारे,
प्रभाग सभापती, नाशिकरोड

LEAVE A REPLY

*