चांदवड तालुक्यातील तरुणांकडून भिवंडीत स्फोटके जप्त

0

चांदवड| हर्षल गांगुर्डे

दि.२२ :  भिवंडी गणेशपुरी (ठाणे) परिसरातील जांभिवली गावाच्या हद्दीतून शनिवारी सायंकाळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एका तवेरा गाडीतून स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यावेळी कारमधून वडाळीभोई (ता. चांदवड) येंथील तिघांना अटक करण्यात आली आहे.

जप्त स्फोटकांमध्ये १२०० डिटोनेटर १५० किलो, ७ बॉक्स जिलेटीन कांड्या प्रत्येकी २५ किलो, १५० किलो अमोनियम नायट्रेट प्रत्येकी ५० किलोच्या तीन बॅग अशा एकूण ४ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून अटक केलेल्या आरोपींची शंकर आहेर (२८), सागर आहेर (२५) आणि अजय गवळी (२७) अशी या आरोपींची नावे असल्याची माहिती आंधळे यांनी दिली.

गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिने अतिशय संवेदनशील समजल्या जाणार्‍या या प्रकारात चांदवड तालुक्यातील तरूण सापडल्याने जिल्हाभरात उलट-सूलट चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

*