Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सोमवारपासून सातबारा मिळणार ऑनलाईन

Share

नाशिक । प्रतिनिधी

मालमत्तांचे सातबारा उतारा व इतर दस्तऐवज डिजिटिलायजेशन करण्याच्या मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या शासनाच्या मोहिमेला हळूहळू यश येत आहे. येत्या सोमवार (दि.२६) पासून नाशिक शहरातील सात-बारा उतारा सर्वच मालमत्ताधारकांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पूर्वी सातबारा उतारा काढण्यासाठी मालमत्ताधारकांना तलाठी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत  होत्या .

शासनाने ग्राहकांना सर्वच सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पेपरलेस कामकाज व वेळ आणि पैशांची बचत हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. या मोहिमेत मालमत्तेच्या नोंदींचा अर्थात सातबारा संगणीकृत करणे हा होता. हे काम जवळपास पूर्ण झाले असेल तरी अद्ययावत झालेला उतारा ऑनलाईन उपलब्ध होण्यास बर्‍याच अडचणी येत असत.

सातबारा ऑनलाईन उपलब्ध होत नसल्याने मालमत्ताधारकांना अडचणीचा सामना करायला लागायचा. नाशिक जिल्ह्यातही ही समस्या मोठी होती. शहरासह शहरालगतची मोठी गावे, तसेच निफाडमधीलही काही गावांमध्ये याबाबत अडचणी होत्या. त्यामुळे ही माहिती ऑनलाईन सर्व्हरवर टाकल्यानंतर संपूर्ण सर्व्हरच ठप्प पडत होते. त्यातून संपूर्ण जिल्ह्यातील सातबारेही मिळण्यास अडचणी येत होत्या.

त्यामुळे नाशिक शहराला ऑनलाईन टाकण्याऐवजी ऑफलाईनच दाखले देण्याची अन् माहिती अद्ययावतीकरणाची व्यवस्था करण्यात आली. संगणकीकृत उतारा तयार झाला. पण तो मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत.

मात्र, खेट्या मारण्याच्या कामातून मालमत्ताधारकांची सुटका झाली असून येत्या सोमवारपासून नाशिक शहरासह तालुक्यातील सर्वच शेतकरी, मालमत्ताधारकांना आपला सात-बारा उतारा ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!