नाशिक | स्वच्छ राजकारणाची आस- यतीन कदम ( राजकारण )

0
राजकारण हे स्वच्छपणे करता येणारे समाजकारणही आहे. ‘मनी-मसल्स पॉवर’ पेक्षा जनतेचा पाठिंबा, विश्‍वासच तुम्हाला राजकारणात यशस्वी करु शकतो. सत्तेबाहेर राहून कुठलेही परिवर्तन जलदपणे शक्य नाही.
राजकारणात मी प्रवेश करेल असे कधी वाटले नाही. माझ्या वडिलांना समाजकारणाची आवड होती. ते सक्रीय राजकारणात होते. विधानसभा सदस्याचा कार्यकाळात म्हणजे आमदार असताना अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी निफाड मतदारसंघात विकास कामाचा नवा मानदंड प्रस्थापित केला.
माझ्या वडिलांच्या राजकारणाचे धडे शिकण्याइतका मी त्यावेळी मोठा नव्हतो. कारण त्यांचे अपघाती निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर आईचे अपघाती राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर राजकारणाचा पिंड नसतानाही आईने राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करत दोन वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत निफाडला विकासाच्या वाटेवर नेले.

वडिलांचे कार्य पाहण्याचा अनुभव माझ्या वाट्याला कमी आले मात्र आईचे काम मी जवळून अनुभवले. आई-वडिल दोघेही राजकारणात आहे असे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येते आणि त्यामुळे त्यांचा वारसा आणि बाळकडू घेऊनच इंजिनियरिंगची पदवी घेऊन मी राजकारणात पाऊल ठेवले.
वडिलांचे काम पाहण्याचे भाग्य मला फारसे मिळाले नाही तरी त्याचा अभ्यासूवृत्ती, हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेण्याची हतोेटी आणि जनहिताच्या कामासाठी आक्रमकपणा मला नक्कीच प्रेरणादायी ठरला. तेच गुण मी माझ्यात बिंबवण्याचा प्रयत्न करतोय. वडिलांच्या निधनानंतर आज २२ वर्षांनंतरही त्याच्या विकास कामांचे ‘मॉडल’ मलाही प्रेरणादायी ठरत आहे.

राजकारणात कुठलीही कूटनीति, छक्केपंजे, डावपेज. साम,दाम,दंड,भेद यांच्या वापराशिवायही राजकारणात सरळमार्गाने काम करता येते याचा आदर्श मला आईकडून शिकायला मिळाला. कावेबाज, धूर्त नेतृत्वाची जी प्रतिमा उभी राहत आहे त्याला पूर्णपणे छेद देणारी आईची राजकीय नेतृत्वाची प्रतीमा मला नेहमीच प्रेरणा देत आहे. म्हणूनच मी आई आणि वडिलांचे हे गुण माझ्यात रुजवण्याचा प्रयत्न करुन राजकीय वाटचाल करत आहे.

सक्रीय राजकाणात पाऊल ठेवातच सुरुवातीचे ३ वर्ष माझ्यासाठी सर्ंघषाचा प्रवास होता. आमच्या आई-वडिलांसोबत असणारा ९५ टक्के गट माझे चुलतबंधु विद्यमान आ. अनिल कदम यांच्यासोबत निघून गेला. त्यामुळे मला शुन्यातून विश्‍व उभे करावे लागले. माझे स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला वेगळे व्हावे लागले.
त्यावेळी राजकीय आसुयेपोटी काही खोटे खटलेही माझ्यावर दाखल झाले मात्र त्यातून मी निर्दोष मुक्त झालोे. २००७ यावर्षी पहिल्यांदा पंचायत समितीची निवडणुक लढली मात्र पहिल्यांदाच पराभूत झालो. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडूक लढवत पुन्हा एकदा पराभवाला सामोरे गेलो. अर्थात हे माझ्यासाठी धक्कादायक नव्हते.

यातून राजकीयपटासाठी बांधणी होत गेली. मी राजकारण सोडून निघून जाईल असेही अनेकांना वाटले. मात्र हार मानने माझ्या रक्तात नाही. अनुभवाची शिदोरी नसल्याने हे स्वाभाविकच होते. या अपयशाने खूप काही शिकवले. जनसंपर्क वाढला, राजकारणाचे धडे मिळाले आणि त्याच शिदोरीवर मी २०१० यावर्षी ग्रामपंचायीतीच्या निवडणूकीत पहिल्यांदा यशाची चव चाखली तिथून यशस्वी सक्रीयं राजकारणाचा प्रवास सुरू झाला.

विकासाचा मुद्या अन् गावकरार्‍यांचा विश्‍वास जिकूंन त्याच्याच भक्कम पाठिब्यांवरच २०१५ यावर्षी ग्रामपंचायती निवडणुकीत जनतने एकहाती सत्ता दिली. माझ्यासह माझी पत्नी निवडून आली. महिला आरक्षणामुळे तिच्या गळ्यात संरपंचपदीचा माळ पडली. २०१७ ंया वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. ग्रामपंचायतीत सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम ओझरमधील अतिक्रमणे काढली.

कोणाचाही रोष न ओढावून घेता अत्यंत शिस्तबद्धरित्या रस्ते रुंदिकरण केले. ‘हिंदुस्थान एअरोनॉटीकल लि. च्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातून रस्त्यांची कामे केली. शहरालगत असल्याने ओझरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना आणि घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान मोठे होते. त्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’च्या माध्यमातून आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली अत्याधुनिक डक्टाईल पाईप लाईन टाकली. त्यामुळे पाणीगळती रोखण्यात यशस्वी झालो.

यासह ‘एचएएल’च्या सहकार्यातून बायोगॅस प्रकल्प उभा राहतोय त्यामध्ये ५ मेट्रिक टन कचरा विघटन होेऊन बायोगॅस मिळणार आहे. त्यातून विद्युत निर्मिती होणार असून हा ‘पायलट’ प्रकल्प इतर गावांना पथदर्शी ठरणार आहे. × ओझरमध्ये अग्रणी असलेल्या बानगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेली १५ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत आहे.

मुलांना शिक्षणातून करिअरच्या वाटा चोखाळत्या याव्या यासाठी अभ्यास आणि वाचनासाठी मी स्व. रावसाहेब कदम सार्वजनिक वाचनालय आणि ज्ञानेश्‍वरी अभ्यासिकेची स्थापना केली. निफाड मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुक लढवणार आहे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील मुलाखत : नयना गावित (राजकारण)

LEAVE A REPLY

*