स्पंदन युवा जगताचे!

बहुचर्चित ‘देशदूत तेजस पुरस्कार २०१८’ सोहळा दिमाखदार स्वरुपात साजरा .

0
बहुचर्चित ‘देशदूत तेजस पुरस्कार २०१८’ सोहळा काल दिमाखदार स्वरुपात झाला. नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात तब्बल तीन तास रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी एकूण बारा श्रेणीतील विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
त्यामध्ये प्राजक्त देशमुख (कला व संस्कृती), गोकुळ जाधव (कृषी), उदय सांगळे (राजकारण), प्रमोद गायकवाड (समाजकारण), प्रसाद खैरनार (क्रीडा), सचिन जोशी (शिक्षण), सोहम गरूड (स्टार्ट-अप्स), पंकज घाडगे (मार्केटिंग व फायनान्स), पवन कदम (तंत्रज्ञान), डॉ. राजन पाटील (वैद्यकीय), ऍड. सुवर्णा पालवे-घुगे (विधी) आणि सचिन गडाख (वाचक) आदींचा समावेश आहे.
सदर सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, सारस्वत बँकेचे संचालक हेमंत राठी, ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा व जनक सारडा, लिनीचे संचालक विष्णूशेठ भागवत, भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक निवृत्ती भदाणे आदी उपस्थित होते.
सदर उपक्रमास सारस्वत बँकेने मुख्य प्रायोजकत्व दिले, तर लिनी (प्रायोजक), भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्स (सहप्रायोजक), दिल्ली पब्लिक स्कूल (नॉलेज पार्टनर) आणि श्री ऍडव्हर्टायझिंग (आऊटडोअर पार्टनर) यांचेही सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

*