Sunday, April 28, 2024
Homeनाशिकपेठ तालुक्यात यंदा बारा हजार विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

पेठ तालुक्यात यंदा बारा हजार विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

कोहोर | वार्ताहर

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्व समग्र शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०२०-२०२१ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र नाशिक यांच्यातर्फे पेठ तालुक्याला पहिल्या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांचा नुकताच पुरवठा करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात कोव्हिड या विषाणूजन्य आजारामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही, हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानादीत शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येतात. या वर्षी करोनाचा संसर्ग आणी लॉक डाऊनमूळे पुस्तके प्राप्त होतात की नाही, या विवचनेत पालक व शिक्षक असतांना बालभारतीने मात्र लॉकडाऊन पूर्वीच पुस्तकांची छपाई पूर्ण केल्याने पालकांची आता चिंता मिटली आहे.

चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर जिल्हा स्तरावरून पुस्तके वाटप करण्यात आली. पेठ तालुक्याला पहिल्या फेरीत काही विषयांचे पुस्तके प्राप्त झाली असून शाळा सुरू होण्यापूर्वी पुस्तके शाळेपर्यंत पोहच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विषय प्रमूख वसंत खैरणार यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमूख, गट साधन केंद्र कर्मचारी यांच्या मदतीने वाटपाचे नियोजन केले आहे.

पहिल्या फेरीत प्राप्त झालेली पुस्तके वर्गनिहाय

इयत्ता दुसरी -२६४२
इयत्ता तिसारी -२९५१
इयत्ता चौथी -२६५३
इयत्ता पाचवी -२४१७
इयत्ता सहावी -२४६७
इयत्ता सातवी -२३५५

- Advertisment -

ताज्या बातम्या