Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकशिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ!

शिक्षण सेवकांच्या मानधनात दुप्पट वाढ!

शिक्षण संचालकांची शिक्षण आयुक्तांकाडे शिफारस

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्यभरातील शिक्षण सेवकांना सध्याच्या मानधनाच्या दुप्पट मानधन देण्याची शिफारस प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे.

त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून मानधनवाढीकडे डोळे लावून बसलेल्या शिक्षण सेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यातील प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार, माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना नऊ हजार रुपये मानधन मिळते. वाढती महागाई, अन्य कारणांमुळे राज्यातील शिक्षण सेवकांकडून सातत्याने मानधनवाढीची मागणी लावून धरण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालकांनी केलेल्या शिफारसीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. या आयोगाच्या शिफारसी मानधनावर कार्यरत सेवकांना लागू नाही. त्यामुळे वाढती महागाई व अन्य कारणांचा विचार करता शिक्षण सेवकांच्या मानधनात किमान दुप्पट वाढ करण्याची शिफारस केली जात आहे. याबाबत उचित कार्यवाही करावी, असे जगताप यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या शिफारसपत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या