Type to search

नाशिक जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

Featured maharashtra नाशिक

नाशिक जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.२१) अध्यक्षा शितल सांंगळे यांनी बोलाविली आहे.जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या या सभेत रणकंदन होण्याची शक्यता आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय पातळीवर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या व पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती या विषयावरुन मंगळवारी सदस्यांनी दुष्काळाची सद्यस्थिती जाणून घेतली असून त्याआधारे होणार्‍या सभेत प्रशासनास जाब विचारणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा मतदानाची आचारसंहिता अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर दुष्काळासाठीही आचारसंहिता शिथील करण्यात आल्याने उपाययोजना सुरु झाल्या आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर अद्याप उपाययोजनांचा दुष्काळ आहे.त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या व टँकरचा मात्र तुटवडा जाणवतो.

चारा, पाण्याअभावी जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आचारसंहितेचा बाऊ केल्यामुळे वेळीच उपाययोजना होऊ न शकल्याची खंत पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही व्यक्त केली . पाणी पुरवठा योजनांची अशीच परिस्थिती सध्या दिसून येते.

तात्पुरत्या स्वरुपात किती पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली याविषयी प्रशासन अनभिज्ञ आहे.त्याप्रमाणे चारा छावण्या, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बैठकांविषयी सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय पातळीवर इतकी अनास्था असल्यामुळे उपाययोजना होत नसल्याचेे चित्र जिल्ह्यात आहे.मात्र,लोकप्रतिनिधी दुष्काळाविषयी फारसे गांभीर्याने आवाज उठवत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे हाल होत आहेत.दुष्काळी तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

महत्वाचे विषय
-दुष्काळ बैठका घेण्यात आल्या का?
-बैठक झालेली नसल्यास त्याची कारणे
-ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काय उपाययोजना केली
-पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती
-तात्पुरत्या स्वरुपात किती योजनांना मंजूरी दिली
-जिल्ह्यातील चारा छावण्यांची परिस्थिती
-शालेय पोषण आहार सुरु की बंद?

मात्र, शाळांमध्ये विद्यार्थी येत नाहीत आणि दुष्काळामुळे पाणीच उपलब्ध होत नसल्याचे कारण देत शिक्षकांनी पोषण आहारापासून पळ काढला आहे. या योजनेचा पूरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. त्यावर जिल्हा परिषद सदस्य आवाज उठविण्याची शक्यता आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!