Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मंगळवारी आरक्षण सोडत; इच्छुकांचे वेधले लक्ष

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी (दि.१९) निघत असून,या आरक्षण सोडतीनंतर पुढील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याने आरक्षण कोणत्या संवर्गाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आतापर्यत निघालेल्या आरक्षणाचा विचार करता,एससी,एसटी (पुरुष) अथवा सर्वसाधारण पदासाठी आरक्षण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नेमके काय निघणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे या सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून विराजमान झाल्या.तत्पूर्वी विजयश्री चुंभळे या ओबीसी महिला या प्रवर्गातून अध्यक्ष झाल्या होत्या. त्याअगोदर जयश्री पवार या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून अध्यक्ष झाल्या होत्या. मायावती पगारे (एससी महिला), राधाकिसन सोनवणे (इतर मागास प्रवर्ग) यांनी आरक्षण पद्धतीनुसार आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे अनूसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी़) या प्रवर्गातील महिला अध्यक्ष झालेल्या असल्या तरी पुरुषांना संधी मिळालेली नाही. तसेच सर्वसाधारण अध्यक्ष अलीकडच्या काळात झालेला नसल्यामुळे येत्या १९ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपद या तीन संवर्गापैकी एकाला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेच्या धर्तीवरच महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असल्याने त्यांचा अध्यक्षपदावर दावा असू शकतो. राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्ष येऊ शकते. यात राष्ट्रवादीने काही सदस्यांना ओढल्यास ते अध्यक्षपदासाठी दावा ठोकू शकतात. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सन २०१४ मध्ये ज्याप्रमाणे राजकीय समीकरणे जुळवून आणली होती. त्याचीच पुरावृत्ती याही वेळी होणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. यात राष्ट्रवादीला अध्यक्षपद खेचण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होऊ शकतो.मात्र, शिवसेना यास तयार होण्याची शक्यता कमी आहे. महाशिवआघाडीकडून सभापती पदे समसमान वाटून घेऊन सत्ता स्थापन होऊ शकते असेच सध्याचे चित्र आहे..

संभाव्य आरक्षणाचा विचार करता अध्यक्षपदासाठी हे असू शकतात दावेदार

एससी-कविता धाकराव,सुनीता पठाडे, दादाजी शेजवळ (शिवसेना), यशवंत शिरसाठ (राष्ट्रवादी), आशा जगताप (भाजप)

एसटी – दीपक शिरसाठ, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, भास्कर गावित (शिवसेना),जयश्री पवार व अर्पणा खोसकर (राष्ट्रवादी), सुनीता चारोस्कर,यशवंत गवळी,अशोक टोंगारे (काँग्रेस),कलावती चव्हाण (भाजप)

सर्वसाधारण – या आरक्षणात पक्षाकडून कोणासही संधी दिली मिळू शकते. त्यामध्ये सुरेखा दराडे,बाळासाहेब क्षीरसागर, सविता पवार, रमेश बोरसे (शिवसेना).संजय बनकर,किरण थोरे, सिध्दार्थ वनारसे, सिमंंतिनी कोकाटे (राष्ट्रवादी-काँग्रेस).अश्विनी आहेर(काँग्रेस)धनश्री आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डेे (भाजप).

पक्षीय बलाबल
शिवसेना-२५
राष्ट्रवादी-१६
भाजप-१७
काँग्रेस-८
माकप-३
रिक्त-४

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!