Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

जागतिक पर्यावरण दिन विशेष : मुलांना झाडांची माहिती देणारे ‘महिंद्र हरियाली उद्यान’

Share

नाशिक | रविंद्र केडीया

उद्योगाचा विकास करताना परिसरातील वातावरणही प्रसन्न करण्याच्या दृष्टीने महिंद्र कंपनीने पूढाकार घेतला आहे.महिंद्र कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत (सिएसआर) पर्यावरण जतनाफसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.त्यात बोरगडचा डोंगर,आळंदी डॅम परिसर हिरवा करण्याचा संकल्प महिंद्र कंपनीने हाती घेतलेला आहे.

याच उपक्रमात महिंद्र कंपनीने गणेश नगर भागातून वाहत जाणार्‍या नैसर्गिक नाल्यामुळे परिसरत पसरलेल्या घाणीचे रुप पालटून येथील सूमारे साडेसात एकराच्या भूखंडावर आकर्षक वनराईने सजलेले पर्यटन स्थळ विकसित करुन निर्सग साधनांचा विकास केल्याने शहराचे ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पिल अ‍ॅण्ड लर्न या संकल्पनेतून सूमारे साडेसात एकरच्या भूखंडावर विद्यार्थ्यांना झाडांची पानांची व फूलांची ओळख व्हावी या उद्देशाने विविध १५० जातींच्या जाडांची लागवड करण्यात आलेली आहे.यात प्रामुख्याने वड पिंपळ, आंबा, निलगिरी, कडूलिंब, पेरु, अशोका, चिंच, बोर, लिंबू, साग, बोरआवळा नारळ यासह विविध जातींच्या झाडांचा समावेश आहे. त्यासोबतच फूलझाडांच्याही अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे सकाळ सायंकाळ या परिसरात पक्षांचे मोठे वास्तव्य राहत असते.

याठिकाणी मोर, चिमणी, कोकीळा, कबूतर यांच्यासह नवनवीन जातीच्या पाहुण्या पक्षांचे आगमन मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी पक्षांंंच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पाण्याचे भांडे भरुन ठेवण्यात आलेले आहेत. पावसाळ्यात या परिसरात पक्षांचा मोठा कलकलाट राहत असतो. महिंद्र कंपनीच्या माध्यमातून परिसरातील कचरा स्वच्च केला जात असल्याने या भागाला आकर्षकपणा आलेला आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत दहाहजाराहुन जास्त मुलांनी भेट दिली आहे.

एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प                                                            महिंद्रा नाशिक प्लान्ट च्या वतीने जलसंधारण विभागाच्या सहकार्याने या परिसरातील १७५ एकर भूखंडावर ही झाडे लावली जाणार आहे. मागील दोन वर्षात आळंदी व कश्यपी धरणाजवळ महिंद्रा हरियाली या उपक्रमांतर्गत सुमारे ४६ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यंदा त्यात दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.पूढील दोन टप्पात २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ४६ हजार झाडांचे उत्तमरित्या संगोपन केलेले आहे. विविध प्रकारच्या देशी व जंगली झाडांच्या लागवडीला प्राधान्य देउन व विविध स्थानिक पक्षी व प्राणी यांना विचारात घेउन त्याप्रमाणे झाडांची लागवड करून पर्यावरण संतूलन राखण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.या वर्षीसुध्दा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कंपनीने १०,००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!